Supriya_Sule
Supriya_Sule 
पुणे

धनगर समाजालाही तातडीने आरक्षण द्यावे - सुप्रिया सुळे

मिलिंद संगई

बारामती शहर - मध्यप्रदेशमधील धनगर समाजाला एससी आणि एसटी वर्गात समाविष्ट करून त्यांना आरक्षण देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील धनगर समाजालाही तातडीने आरक्षण द्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली.

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात नियम ३७७ अंतर्गत  सुळे यांनी ही मागणी केली. देशाच्या इतर प्रदेशातील धनगड आणि महाराष्ट्रातील धनगर हा वास्तविक एकच समाज आहे. त्यामुळे मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही धनगर आरक्षण मिळाले पाहिजे, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्र सरकारकडून १९६६ आणि १९७९ अशा दोन वेळी केंद्राकडे याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी आठवणही त्यांनी करून दिली. 

सध्या महाराष्ट्रातील धनगर समाजाला विमुक्त जाती आणि भटक्या विमुक्त जाती संवर्गानुसार साडेतीन टक्के आरक्षण आहे. ते एक कोटी लोकसंख्येच्या आधारावार आहे. त्यांना अनुसूचित जाती संवर्गात समाविष्ट केल्यास सध्याच्या लोकसंख्येनुसार आरक्षणाचा फायदा होईल. त्यामुळे लवकरात लवकर या समाजाला अनुसूचित जमतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT