आरे स्टॉलवर आरे ब्रँडचे
दूध विकणे बंधनकारक
कारवाईच्या इशाऱ्याने स्टॉलधारकांमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : आरे दूध केंद्रांवर महानंद दुग्धशाळेमार्फत ‘आरे ब्रँड’चे दूध उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सर्व आरे दूध स्टॉलधारकांना आरे ब्रँडच्या दुधाची विक्री करणे बंधनकारक असेल. विक्री न करणाऱ्या स्टॉलधारकांवर शासन नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आल्याने स्टॉलधारकांमध्ये नाराजी आहे.
आयुक्तांसोबत एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने ऑक्टोबरमध्ये आरे, कुर्ला आणि वरळी दुग्धशाळांच्या प्रभारी व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या. आरे, कुर्ला आणि वरळी दुग्धशाळा बंद झाल्यामुळे २२ जुलै २०२२ पासून आरे दुधाचे संकलन आणि उत्पादन पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे सध्या आरे दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. स्टॉलधारकांना अन्य सहकारी व खासगी दुग्धशाळांचे दूध विकण्याची परवानगी आहे.
अधिभार रद्द करा
महानंदमार्फत आरे ब्रँडचे दूध उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वितरण आणि कमिशन याबाबत महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी माहिती दिली. मात्र, केवळ दूध विक्रीतून स्टॉल चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे स्टॉलधारकांनी सांगितले. आरे दुग्धजन्य पदार्थ व सहउत्पादने उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. स्टॉलधारकांनी दुधासाठी आगाऊ भरलेली रक्कम परत मिळावी तसेच भुईभाड्यावरील १५ टक्के अधिभार रद्द करावा, अशी मागणीही केली.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.