aarati pavar 
पुणे

दौंडच्या लेकीने नाव काढलं, नोकरी सांभाळून झाल्या डीवायएसपी 

रमेश वत्रे

केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथील आरती राजेंद्र पवार यांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली. एनटीबी या कॅटेगिरीमधून त्या राज्यात पहिल्या आल्या आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल आज सायंकाळी जाहीर झाला. त्यात आरती पवार यांनी पहिल्या प्रयत्नात हे यश मिळविले आहे. आयोगामार्फत त्यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. यापूर्वी त्यांची पोलिस उपनिरीक्षक, मंत्रालय कक्ष अधिकारी, कर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. सध्या त्या बारामती नगरपालिकेमध्ये कर निरीक्षकपदावर कार्यरत आहेत. झारगडवाडी येथील जिल्हा परिषदेचे आदर्श प्राथमिक शिक्षक राजेंद्र पवार यांच्या त्या मुलगी आहे. 


आरती यांचे प्राथमिक शिक्षण देऊळगावगाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे, तर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यांच्या या यशाबद्दल देऊळगावगाडा येथे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

या यशाबद्दल आरती पवार म्हणाल्या, मी गेली तीन वर्षे साधा मोबाईल फक्त कॅालिंगसाठी वापरला आहे. सोशल मीडियापासून मी सुरवातीपासून दूर राहिले आहे. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनी असा कोणताही न्यूनगंड बाळगू नये. माझ्या आईवडिलांनी मला खूप सहकार्य केले. मला कोणतेही काम सांगितले नाही. किंवा माझ्यापुढे कोणत्याही समस्या आणल्या नाहीत. मला प्राध्यापक व्हायचे होते, मात्र बरोबर आजपासून तीन वर्षापूर्वी 19 जून 2017 रोजी मी शिवाजीराव मोरे यांच्या राज अॅकेडमीने आयएएस झालेल्या सूरज जाधव यांचे व्याख्यान ठेवले होते. ते ऐकले आणि प्राध्यापकाची नोकरी सोडली. आणि फक्त स्पर्धा परीक्षेवर फोकस केला. गेल्या अडीच वर्षात मी चार स्पर्धा परीक्षा क्रॅक केल्या. आई व वडीलांनी मला पूर्ण फ्री हॅंड दिला होता. शिक्षक व आईवडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावणे गरजेचे वाटत नाही. कारण, क्लासेस हे फक्त तुम्हाला दिशा दाखवतात. मेहनत प्रत्येकाला आपआपली करावी लागते. आज मिळालेले यश अपेक्षेपेक्षा मोठे आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात दोन ठार; सिंदेवाही, सावली तालुक्यांतील घटना, नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण

ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १६ जणांचा मृत्यू; हल्लेखोर बापलेक पाकिस्तानचे

Latest Marathi News Live Update : यवतमाळमधील मुडाणा गावात घराला भीषण आग

Nagpur Crime: वाटणीवरून थोरल्‍याने केला धाकट्याचा खून; मोहगाव सावंगी, नाल्यात जळालेल्या अवस्थेत शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

Panchang 15 December 2025: आजच्या दिवशी विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे आणि ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT