Abel 521  sakal
पुणे

Abel 521 : ‘एबेल ५२१’ दीर्घिका समूहाचा ‘जीएमआरटी’कडून वेध

पृथ्वीपासून २०० कोटी प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या ‘एबेल ५२१’ दीर्घिका समूहाचा वेध घेण्यात यश मिळवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पृथ्वीपासून २०० कोटी प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या ‘एबेल ५२१’ दीर्घिका समूहाचा वेध घेण्यात यश मिळवले आहे. या दीर्घिका समूहाची आतापर्यंतची सर्वांत तपशीलवार प्रतिमा तयार करण्यासाठी खोडद येथील अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा (जीएमआरटी) वापर केला आहे.

‘एबेल ५२१’ आकाशगंगा समूहाच्या निरीक्षणासाठी भारत, इटली आणि अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञांच्या समूहाने अत्याधुनिक दुर्बिणींचा वापर केला आहे. यामध्ये अद्ययावत केलेली नारायणगाव जवळील ‘जीएमआरटी’ महाकाय रेडिओ दुर्बीण तसेच चंद्रा आणि एक्सएमएम-न्यूटन या क्ष-किरण दुर्बिणींचा समावेश आहे.

ही निरीक्षणे करण्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धतींचा समावेश केला आहे. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राचे (एनसीआरए) प्राध्यापक ऋता काळे आणि पीएच.डी.चे संशोधक विद्यार्थी रामानंद संत्रा यांनी दीर्घिका समूहाची संरचना प्रसिद्ध केली आहे. ‘द ॲस्‍ट्रोफिजिकल जर्नल्स’ आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

‘एबेल ५२१’ आकाशगंगा समूहाची (क्लस्टर) रेडिओ प्रतिमा दक्षिण भागात सुंदर कमानीसारखी दिसते. चंद्रा वेधशाळेने टिपलेले क्ष-किरण उत्सर्जन क्लस्टर केंद्राजवळील रेडिओ संरचनांशी अतिशय साम्य दर्शवते. दीर्घिका समूहांमध्ये शेकडो ते हजारो आकाशगंगा गुरुत्वाकर्षणाने एकत्र बांधलेल्या असतात. समूहांच्या मध्यभागी एक विशाल महासागरासारखे सदृश उष्ण (दहा दशलक्ष केल्विन किंवा त्याहून अधिक तापमानासह) प्लाझ्मा असतो.

आकाशगंगा समूहांमधील टक्करी मोठ्या प्रमाणात ऊर्जा सोडतात. यामुळे प्लाझ्मा माध्यमावर लक्षणीय परिणाम होतो. ‘एबेल ५२१’ हे पृथ्वीपासून सुमारे तीन अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या अशाच विशाल आकाशगंगा समूहांपैकी एक आहे, जे अत्यंत विस्कळीत प्लाझ्माचे उदाहरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 20th Installment: शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता; लाभार्थी यादी कशी तपासाल?

Sarpanch Election : कोल्हापुरात लोकनियुक्त सरपंचांना हटवण्यासाठी संपूर्ण गावाने मतदान केलं, अन् अविश्वास ठराव आणला; नेमकं काय घडलं

Latest Marathi News Updates : जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल

'जखमा होण्याची कारणं वेगळी असली तरी...' तेजस्विनी पंडितची खास पोस्ट, म्हणाली...'आता ते सगळं...'

Vidhansabha Rada: मुख्यमंत्री चप्पल सोडून पळाले! महाराष्ट्रातल्या विधानसभेत धक्काबुक्की, शिव्या... अन् अखेर पलायन!

SCROLL FOR NEXT