abhijit bichukale got death threat call over kasba peth by-election 2023 candidature pune  Google
पुणे

Kasba By-Election : अर्ज मागे घे अन्…; अभिजीत बिचकुलेंना जीवे मारण्याची धमकी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : बिग बॉस फिल्म अभिजीत बीचुकले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर बीचुकले यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी बिचुकले यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा आशा धमक्या येत असल्याचा बिचुकले यांचा आरोप आहे. यानंतर अभिजीत बीचुकले यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहीलं आहे.

बिचकुले यांनी लिहीलेलं पत्र

अन् बिचकुले पत्रकारांवर संतापले...

मागील काही दिवसांपासून पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीची धामधूम सुरू आहे. यादरम्यान काल पत्नीचा उमेदवारी अर्ज भरायला आलेला बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे चर्चेचा विषय ठरले. कसब्यातले प्रमुख प्रश्न कोणते आहेत, असा प्रश्न विचारला असता बिचुकले पत्रकारांवर संतापल्याचे पाहायला मिळाले.

कसबा निवडणुकीसाठी आपली पत्नी अलंकृता यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अभिजीत बिचुकले यांना माध्यमांनी कसब्यातले प्रमुख प्रश्न कोणते याविषयी विचारला. त्यावर त्याने उत्तर देताना बिचकुले संतापले, जे निवडून गेलेले , त्यांनी काय केलं, त्यांना विचारा. मला प्रश्न माहित नाहीत, जनतेला माहित आहेत. जनतेसाठी मी सर्वस्व आहे. तुम्ही सांगा मी सोडवणार.असं उत्तर त्यांनी दिलं.

या मतदारसंघातून निवडणूक लढवणार तर तिथला तुम्ही काही अभ्यास केला असेल ना, असं पत्रकारांनी विचारलं असता बिचुकलेने माध्यम प्रतिनिधींनाच सुनावलं आहे. माझा अभ्यास काढू नका, तुझा किती अभ्यास आहे. मी कसब्याचा उमेदवार आहे. उद्याचा नेता, भावी मुख्यमंत्री आहे. हा माझा स्थायीभाव आहे, मी चिडलो नाहीये, अशा शब्दात बिचुकलेने पत्रकारांना सुनावलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT