पुणे

अभिजीत दीपकेंना सशर्त जामीन, नेहा बोरा यांची सुटका  <Br>

CD

अभिजीत दीपके यांना
सशर्त जामीन

नेहा बोराचीही दिल्ली पोलिसांकडून सुटका

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, ता. १७ : कॅनॉट प्लेसच्या  सेंट्रल पार्कवर शुक्रवारी  ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाचे आवाहन करणारे कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांची शनिवारी जामिनावर सशर्त सुटका करण्यात आली; तर ‘आईसा’ची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरालाही शनिवारी पहाटे सोडण्यात आले. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी या दोघांना ताब्यात घेतले होते.  
दरम्यान, आंदोलनास प्रतिबंधित करण्यात आलेल्या जंतरमंतरवर लोखंडी प्रवेशद्वारावरून उड्या मारून तिरंगा फडकावल्यामुळे पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आलेले ‘सीजेपी’चे मुख्य प्रवक्ते सौरभ  दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांची शनिवारी रात्री सुटका होण्याची शक्यता आहे.
कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कवर ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन करण्याचे आवाहन दीपकेने केले होते. या आंदोलनासाठी छोट्या-छोट्या समूहांमध्ये येण्यासही त्याने सांगितले होते. या आंदोलनासाठी आपल्या निवासस्थानातून बाहेर पडत असतानाच त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. आज त्यांना मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात  विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. दीपके  यांच्या वतीने ‘सीजेपी’च्या  विधी विभागाच्या प्रमुख रत्ना सिंह यांनी युक्तिवाद केला. दीपके  यांना आज ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर शांतता भंग न करण्याच्या अटीवर सशर्त जामीन देण्यात आली. यावेळी मंदिर मार्ग पोलिस ठाण्यापुढे मोठ्या संख्येने दीपके यांचे समर्थक गोळा झाले होते.
 मंडी हाऊस परिसरातून शुक्रवारी  सायंकाळी  ताब्यात घेण्यात आलेल्या नेहा बोराला रात्री आरके पुरम  पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते, आज पहाटे तिची सुटका करण्यात आली. अनेक तास अवैधपणे ताब्यात ठेवल्यानंतर आपली सुटका झाल्याची  माहिती नेहा बोराने ‘एक्स’ हँडलवरून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Pune News : झाडणकाम वाढले, रस्ते स्वच्छ, उकिरडे झाले कमी

Rapido Crime : बेकायदा प्रवासी वाहतूकप्रकरणी ‘रॅपिडो’वर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT