Mono Rail  sakal
पुणे

Mono Rail : कोथरूडमधील मोनो रेलचे काम रद्द करा ; ‘आप’ची मागणी

कोथरूडमधून खरीखुरी मेट्रो धावत असताना पाच कोटी रुपये खर्च करून थोरात उद्यानात मोनोरेलचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्यासाठी ७० खांब उभे केले जाणार आहेत, पण यामुळे उद्यानातील शांतता भंग होऊन नागरिकांना फिरण्यासाठी पुरेशी जागा राहणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोथरूडमधून खरीखुरी मेट्रो धावत असताना पाच कोटी रुपये खर्च करून थोरात उद्यानात मोनोरेलचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्यासाठी ७० खांब उभे केले जाणार आहेत, पण यामुळे उद्यानातील शांतता भंग होऊन नागरिकांना फिरण्यासाठी पुरेशी जागा राहणार नाही. त्यामुळे हे काम रद्द करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे केली आहे.

डॉ. अभिजित मोरे, ॲड. अमोल काळे, आरती करंजावणे यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. कोथरूडमधील थोरात उद्यान हे सर्वात मोठे उद्यान आहे. या ठिकाणी कोथरूड परिसरातील नागरिक चालणे, पळणे, व्यायामासाठी येतात, तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी घेऊन येणाऱ्या पालकांचे प्रमाण मोठे आहे. अनेक विद्यार्थी या उद्यानात अभ्यास करतात. त्‍यामुळे उद्यानात मोनो रेल झाल्यास नागरिकांची अडचण होणार आहे.

या उद्यानात मोनो रेल सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केलेली नाही. कोथरूडमध्ये खरीखुरी मेट्रो धावत असताना ही खेळण्यातील मोनोरेल नागरिकांवर लादू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. थोरात उद्यानातील मोनो रेलला विरोध करणारे आपचे निवेदन प्राप्त झाले असून, महापालिका आयुक्तांकडे यासंदर्भात चर्चा केली जाईल.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT