खडकवासला (पुणे) : अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मागील आठवड्यात सिंहगड पर्यटकांसाठी खुला झाला. त्यानंतर पहिल्यांदाच पर्यटकांची गर्दी सिंहगडावर सुरू झालेली आहे. शनिवार व रविवार असे सलग सुट्टीचे दिवशी सिंहगडावर या दोन दिवसात सुमारे १३ हजार पर्यटकांनी भेट दिली.
सिंहगड सुरू झाल्यानंतर हा पहिलाच शनिवार- रविवार असल्यामुळे पर्यटकांची ओढा वाढला होता. असे भांबुर्डा वनपरिक्षेत्र विभागाच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सिंहगडावर एक हजार ८२६ दुचाकीने तीन हजार ७०० आणि ७९४ चारचाकीने सुमारे चार हजार १०० पर्यटक गडावर गेले होते. याचबरोबर खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनाने सुमारे एक हजार २००जण गडावर पोचले. नऊ हजार जण आले होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शनिवारी 648 दुचाकी वरून सुमारे एक हजार ३५० तेराशे हून अधिक पर्यटक ३७७ चार चाकी मधून सुमारे एक हजार 945 हून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांतून 865 असे चार हजार 155 पर्यटक गडावर पोहोचले होते. दोन्ही दिवशी मिळून १३ हजार १५५ पर्यटक आले होते. गडावर पर्यटक येऊ लागल्याने आज येथे खाद्य पदार्थ विकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.