पुणे

महत्वाची बातमी : पुण्यातील मेट्रोचे काम...महाराष्ट्र सरकार...अन् कामावरचे मजूर...

सकाळवृत्तसेवा

पुणे - लेबर कॅंपमध्ये पुरेशा सुविधा मिळत नाहीत म्हणून आम्हाला गावाला जायचे, असे मजुर म्हणतात तर, पुरेशा सुविधा दिल्या जात असल्यामुळेच 99 टक्के मजूर लेबर कॅंपमध्येच आहेत, असा दावा महामेट्रोने मंगळवारी केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात विविध राज्यांतील 2 हजार 843 मजूर काम करीत आहेत. अन्न-पाणी आदी सुविधा न मिळाल्यामुळे एकाही मजुराने लेबर कॅंप सोडलेला नही. तर, गावाकडे जाण्याची ओढ लागल्यामुळे सुमारे 80 मजूर गेले आहेत, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. महामेट्रोच्या कोथरूड येथील लेबर कॅंपमधील सुमारे 80 मजूर सोमवारी दुपारी झारखंडला जाण्यासाठी रवाना झाले. कंत्राटदाराने पुरेशा सुविधा दिल्या नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते. या बाबत महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 10 लेबर कॅंप आहेत. त्यात 2843 मजूर राहतात. 25 मार्चपासून अगदी गेल्या आठवड्यापर्यंत काम बंद असतानाही सर्व मजुरांना त्यांची मजुरी देण्यात आली आहे. तसेच लेबर कॅंपमध्ये महामेट्रोकडून त्यांना अन्न-धान्य पुरविण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी, काळजी सातत्याने घेतली जाते. त्यासाठी डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून औषधेही दिली जातात. मजुरांना, त्यांच्या मुलांना मनोरंजनासाठी कॅरम, बुद्धीबळ, पत्ते आदी साधनेही दिली आहेत. त्यामुळे काल गेलेले 80 मजूर वगळता एकही मजूर गावी परत गेलेला नाही. आता कामेही सुरू झाले आहेत. त्यामुळे ते कामावर जाणे पसंत करीत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मजुरांचा एक ग्रूप झारखंडचा होता. त्यांना गावी परत जायचे होते. त्यांच्या ठेकेदाराने ट्रेनसाठी त्या मजुरांची नोंदणी केली होती. परंतु, रेल्वे गाड्या सुरू झाल्याचे समजल्यावर ते परतण्यासाठी अधीर झाले. थांबण्यासाठी त्यांना महामेट्रोने जबरदस्ती केली नाही, असेही सोनवणे यांनी सांगितले. 

पुण्यात वनाज - रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या दोन मार्गांचे काम सध्या सुरू आहे. सुमारे 31 किलोमीटरचे हे मार्ग आहेत. 25 मार्चपासून लॉकडाऊनमुळे मेट्रोचेही काम बंद होते. परंतु, गेल्या आठवड्यातच केंद्र सरकारच्या सूचनांनुसार राज्य सरकारने पुणे आणि मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार येथील दोन्ही शहरांत मेट्रोचे काम आता सुरू झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT