पुणे

लॉकडाऊनमध्ये अडकले होते दीड हजार परदेशी नागरिक; पण आता...

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरात वेगवेगळ्या कारणासाठी आलेल्या, मात्र लॉकडाऊनमुळे शहरात अडकुन पडलेल्या सुमारे दिड हजार परदेशी नागरीकांना त्यांच्या मायदेशी जाण्यासाठी पुणे पोलिसांनी मदतीचा हात दिला. या नागरीकांना तत्काळ पोलिस परवानगी, प्रवासाची व्यवस्था व नाष्टा, जेवण यांसारख्या सुविधा देत पोलिसांनी त्यांना मदतीचा हात दिला.

शहरात शिक्षण, मोठमोठ्या खासगी कंपन्यामधील नोकरी, पर्यटन, वैद्यकीय उपचार अशा वेगवेगळ्या कारणासाठी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जापान, स्वीडन, अफगाणिस्तान, बहरीन, इराण, व्हिएतनाम, कॅनडा यासह अनेक देशांच्या नागरिकांची ये-जा सुरु असते. मात्र, कोरोनामुळे 22 मार्चपासून शहरात लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे स्थानिक वाहतूक व्यवस्था व विमानसेवाही बंद करण्यात आली. परिणामी, अनेक परदेशी नागरिक अडकून पडले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संबंधित नागरिकांची त्यांच्या देशात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु होते. त्यासाठी त्यांच्याकडून विमानाची सुविधा, आपापल्या देशांच्या दूतावासाचे पत्र व पुणे पोलिस यांच्याकडे विचारणा केली जात होती. दरम्यान, परदेशी नागरिकांचा प्रश्न अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे व पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्यापर्यंत पोचला. त्यानंतर त्यांनी तत्काळ परदेशी नागरिकांना जाण्यासाठी पोलिस परवानगी व अन्य व्यवस्था करण्याचे आदेश दिले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, लॉकडाऊनच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात त्या-त्या देशानी आपापल्या नागरिकांसाठी विशेष प्रवासी विमाने पाठविली होती. मात्र बहुतांश आंतरराष्ट्रीय विमाने ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून जात होती. त्यामुळे संबंधित प्रवाशांना तत्काळ पोलिस पास उपलब्ध करुन देण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले. तसेच लॉकडाऊनमुळे सर्व वाहनांना प्रवासासाठी बंदी असल्याने ठिकठिकाणच्या नाक्यावर पोलिसांकडून तपासणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र खासगी वाहनाची व्यवस्था केली.

तसेच हॉटेल बंद असल्याने परदेशी नागरिकांची खाण्या-पिण्याची आबाळ होऊ नये, यासाठी त्यांना जेवण, नाष्टाची पाकिटे व सुके खाद्यपदार्थ पोलिसांनी दिले. पोलिसांनी केलेल्या या मदतीबद्दल परदेशी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"लॉकडाऊनमध्ये काही परदेशी नागरीक पुण्यात अडकले होते. त्यांची माघारी परतण्यासाठी विमानाची व्यवस्था झाल्यानंतर संबंधीत देशांच्या दुतावासातर्फे पुणे पोलिसांना त्याबाबतचे पत्र पाठविले जात होते. त्यानंतर संबधित नागरीकांना तत्काळ पोलिस परवानगी देऊन त्यांच्या जाण्याची व्यवस्था केली जात होती." 

मायदेशी गेलेल्या नागरिकांची संख्या

देश                  नागरिकांची संख्या
अमेरिका        -            310
बहरीन           -            168
जर्मनी            -            138
अफगानिस्तान -             92
इराण             -              43
व्हिएतनाम      -              35
स्वीडन           -              34
जपान            -              31
कैनडा            -             25
फ्रान्स            -              20

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT