पुणे

विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुंडली पोर्टलवर! 

मीनाक्षी गुरव

पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुंडली आता सरकारने तयार केलेल्या खास पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बोगस कागदपत्रांच्या आधारे या अभ्यासक्रमाच्या पदव्या पदरात पाडून घेणाऱ्यांना चाप बसणार आहे. 

राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत (सीईटी-सेल) सरकारने यासाठी "सफलता' नावाने पोर्टल विकसित केले आहे. या शैक्षणिक वर्षापासून हे पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती या पोर्टलवर संकलित केली जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशावेळी सादर केलेल्या दहावी, बारावी, पदवी गुणपत्रिका, ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला तसेच उत्पन्न, जात, जातवैधता, अधिवास प्रमाणपत्र या कागदपत्रांचा समावेश असेल. अनुदानित, विनाअनुदानित, खासगी, अल्पसंख्याक अशा सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची माहिती या पोर्टलवर उपलब्ध केली जाणार आहे. 

प्रवेश परीक्षेनंतर विद्यार्थी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जातात. त्यावेळी विद्यार्थ्यांची आवश्‍यक कागदपत्रे महाविद्यालयात जमा करून घेतली जातात व तात्पुरता (प्रोव्हिजनल) प्रवेश दिला जातो. त्यानंतर ही कागदपत्रे संबंधित विभागाकडे पाठवून त्यांची शहानिशा केली जाते. या प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित होतो. मात्र, आता विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर ती विद्यार्थ्यांच्या नावाने एकाच वेळी पोर्टलवर अपलोड केली जाणार आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर, एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात ने-आण करण्याचा त्रास कमी होणार आहे. तसेच खोटी कागदपत्रे सादर करून अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची बनवेगिरी निदर्शनास येण्यास मदत होणार आहे, असे सीईटी-सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले. 

सफलता पोर्टलचे फायदे : 

- विद्यार्थ्याने प्रवेशावेळी सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती मिळणार 
- बोगस विद्यापीठे, महाविद्यालयातून पदव्या घेणाऱ्यांना रोखता येणार 
- नोकरी देणाऱ्या कंपन्यांनाही विद्यार्थ्यांची कागदपत्रांची शहानिशा करता येणार 
- विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे आणि दाखले "डिजिटल'द्वारे संकलित होणार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT