acb raid in pune mhada office project manager arrested while taking 2 lakh 70 thousand rupees bribe pune crime news  Esakal
पुणे

Mhada News: पुणे म्हाडा कार्यालयात ACB ची धाड; २ लाख ७० हजार रूपयांची लाच घेताना प्रोजेक्ट मॅनेजरला अटक

Mhada News: म्हाडा योजनेतील सदनिका फेरवितरण पद्धतीने मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने २ लाख ७० हजार रूपयांची लाच घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. म्हाडा योजनेतील सदनिका फेरवितरण पद्धतीने मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने २ लाख ७० हजार रूपयांची लाच घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. पुणे स्टेशन परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबधित प्रकरणात अटक करण्यात आलेल्याचे नाव कर्मचाऱ्याचे नाव अभिजीत व्यंकटराव जिचकार (वय ३४, रा. वाकड) असं आहे. याबाबत एसीबीकडे एका ६० वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिलेली होती. आरोपी अभिजीत म्हाडा कार्यालयात कंत्राटी कर्मचारी आहे.

मँनेजरने तक्राराकडे २ लाख ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचेच्या मागणीची पाच दिवस पडताळणी केल्यानंतर पुणे म्हाडाचे प्रोजेक्ट मँनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार,म्हाडाचे मुख्याधिकारी यांच्यासाठी २ लाख २० हजार तर प्रोजेक्ट मँनेजर यांनी स्वतःसाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर २ लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचासमोर अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव आणि पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक वीरनाथ माने प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT