पुणे

Pune News : अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला गती

60 लाख रुपयांच्या उर्वरित रस्त्याच्या कामाची सुरुवात; माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी : अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला अखेर गती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात अर्ध्या रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले होते.

महापालिकेच्या पथ विभागातर्फे सध्या उर्वरीत रस्त्याच्या 60 लाख रुपयांच्या कामाची सुरूवात झाली आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या कामाचे उद्धाटन भाजपाचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,

आरपीआय आठवले गटाचे पुणे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, अल्पसंख्यांक आघाडीचे राज्य अध्यक्ष आयुब शेख, माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी नगरसेवक ऍड. भगवान जाधव, सचिन धीवार, भाजपा प्रवक्ता मंगेश गोळे, माजी नगरसेविका फरजाना शेख प्रभाग दोन मधील विविध धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, आरपीआय आठवले गट, भाजपा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सार्वजनिक, सामाजिक मंडळांचे पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, अग्रेसन शाळा ते ई-कॉमरझोनचा रस्ता पुर्ण झाल्यास वाहनधारकांची होणारी मोठी गैरसोय टळणार आहे. वाहनधारकांना मारावा लागणारा मोठा वळसा कमी होणार असून अंतर आणि वेळ वाचणार आहे. मधल्या काळात कोविडच्या महामारीमुळे झालेले लॉकडाऊन, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची संपलेली मुदत यासह अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

हा रस्ता पुर्ण करून नागरिक, नोकरदार, कामगार, वाहनधारकांची गैरसोय दुर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होतो. अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होतो. त्यामुळे या कामाला गती प्राप्त झाली. लवकरच हे काम पुर्ण करण्यात येईल, असे डॉ. धेंडे म्हणाले.

विश्रांतवाडी चौक सुशोभीकरणासाठी आराखडा तयार करण्यासाठी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी पुणे महापालिकेकडे सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. या कामासाठी महापालिकेकडे निधी मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी भाजपा शहराध्यक्ष तथा माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे या वेळी केली.

कॉमरझोन चौकातील वाहतूक कोंडी सुटणार -

प्रभाग दोन मधील कॉमरेझोन चौकात नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनधारक, नागरिक त्रस्त होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाठपुरावा केल्याने विद्युत पथदिवे (सिग्नल) बसविन्यात आले आहेत. तसेच डॉ. धेंडे यांच्या पुढाकाराने चौक सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे चौक आकर्षित होऊन वाहतूक कोंडीपासून देखील सुटका होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT