मुकुंदनगर - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनात रविवारी निधी त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापूर्वी ‘भारत माता की जय... वंदे मातरम्‌’ अशा घोषणा देऊन उत्साह निर्माण केला. 
पुणे

देश अखंड ठेवण्याचे आव्हान स्वीकारा - निधी त्रिपाठी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता देशातील प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी तयार असतो. देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांना ‘जेएनयू’मध्ये रोखले होते. आता ‘सीएए’च्या निमित्ताने बुद्धिवाद्यांकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असताना देशाला अखंड ठेवण्याचे आव्हान विद्यार्थी परिषदेने स्वीकारावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांनी केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश अधिवेशनात त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी प्रांताध्यक्ष प्रा. सारंग जोशी, प्रांत मंत्री स्वप्नील बेगडे, प्रदेश सहमंत्री राघवेंद्र रिसालदार, वेदिका शौनक, विराज भांबरे, प्रज्ञा खैरे, प्रतीक पाटील उपस्थित होते.

त्रिपाठी म्हणाल्या, ‘‘देशात सर्व काही व्यवस्थित सुरू असताना ‘सीएए’ला विरोधासाठी विरोध सुरू झाला आहे. हा कायदा मंजूर झाल्यानंतर काही जणांच्या पोटात दुखायला लागले आहे. पाकिस्तान, बांगलादेशात अत्याचार होत असल्याने तेथील अल्पसंख्याक भारतात येत आहेत. त्यांच्यासाठी ‘सीएए’ आवश्‍यक आहे. पण, बुद्धिवादी लोक या अल्पसंख्याकांना विरोध करून भारतीय समाजात गैरसमज निर्माण करून घुसखोरांना पाठिंबा देत आहेत. बुद्धिवाद्यांनी शरणार्थी आणि घुसखोरांमधील फरक ओळखला पाहिजे.

नक्षलवादाला पाठिंबा देणारे, अफझल गुरूची फाशीची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना भारताची संस्कृती, परंपरा तोडण्यात स्वारस्य आहे. त्यांना देशाच्या परंपरेचे देणेघेणे नाही. भारतात जे घुसखोर आले आहेत ते येथील संस्कृती, इतिहास याचा कधीही स्वीकार करणार नाहीत. मात्र, शरणार्थी आपली संस्कृती मानणारे आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT