Bus Accident Esakal
पुणे

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात एकाचा मृत्यू; जमावाने पेटवला ट्रक

CD

इंदापूर, ता.२५ : गलांडवाडी (ता. इंदापूर) हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर शहर बाह्यवळणाजवळ मंगळवारी (ता.२४) विजयादशमीच्या दिवशीच सकाळी १० वाजता भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले. यामध्ये दशरथ मारुती चोरमले (वय २२, काळखे वस्ती, गलांडवाडी नंबर १, ता.इंदापूर) याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला.

दरम्यान, संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला. पेटवलेला ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना इंदापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस हवालदार अर्जुन नरळे यांना किरकोळ भाजले आहे. यावेळी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचेसह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी इंदापूर नगर परिषदेच्या अग्निशामकच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली.

अपघातप्रकरणी दशरथ यांचे पुतणे रोहिदास बाळू चोरमले यांनी फिर्याद दिली. दशरथ मारुती चोरमले हे आपल्या दुचाकीवरून (एमएच ४२ सी ५६०४) शहरात दूध विक्री करून, घरी निघाले असता ट्रक नंबर (एमएच ३२ एजे ९२७३) हा सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने निघाला होता. यावेळी ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT