Anand Abnave sakal
पुणे

Rahu Accident : उंडवडी येथील धोकादायक वळणावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

दुचाकीवरून जात असताना उंडवडी पुलाच्या पुढील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार सुमारे शंभर फुटाच्या अंतरावर फडफडत जाऊन खड्ड्यात आदळला.

संतोष काळे

राहू - राहू-यवत रस्त्यावरून यवतच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना उंडवडी पुलाच्या पुढील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार सुमारे शंभर फुटाच्या अंतरावर फडफडत जाऊन खड्ड्यात आदळला. हा अपघात काल रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.

तत्काळ उंडवडी येथील ग्रामस्थांनी जखमीला यवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र अपघातात जबरी मार लागल्याने उपचारदरम्यान त्याचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केला. आनंद केरू आबनावे (वय-३७) (रा. न्हावरे, ता. शिरूर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी, प्रत्यक्ष दर्शनी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद हा राहूवरून यवतच्या दिशेने दुचाकीवरून वेगाने चालला होता. दरम्यान उंडवडी पुलावरील धोकादायक वळणाचा अंदाज त्याला न आल्याने त्याची दुचाकी साधारणता शंभर फूट फरफटत जाऊन खड्ड्यात आढळली.

उंडवडीचे पोलीस पाटील राजेंद्र जगताप यांनी यवत पोलिसांना खबर दिली. पोलिसात फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू असून अधिक तपास यवत पोलीस करत आहे.

धोकादायक वळणारवर गतिरोधकाची मागणी -

राहू-उंडवडीमार्गे यवत रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान उंडवडी फुलाजवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून धोकादायक वळण आहे. त्याभोवताली मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेले आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ गतीरोधक उभारण्याची मागणी उंडवडीच्या सरपंच दीपमाला सतीश जाधव, सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंड, उपसरपंच विकास कांबळे, पोलीस पाटील राजेंद्र जगताप यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला स्वत:चाच विक्रम; स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केले तब्बल १०३ मिनिटे भाषण

Latest Marathi News Live Updates : जयकुमार गोरे यांच्या हस्तेजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला ध्वजारोहन सोहळा

Janmashtami Decoration Ideas: जन्माष्टमी निमित्त मंदिर सजवायचंय? या सोप्या आणि सुंदर आयडिया नक्की ट्राय करा!

Independence Day 2025 : महाराष्ट्र कारागृह विभागातील आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा? फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

SCROLL FOR NEXT