Car Drown in Khadakwasala Dam Sakal
पुणे

Khadakwasala Dam Accident : कार गेली थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात; तीन ते चार व्यक्तींना वाचविण्यात यश

पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण फाट्याजवळ पुन्हा एकदा अपघात झाला. कार थेट गेली खडकवासला धरणाच्या पाण्यात.

निलेश बोरुडे

सिंहगड - पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण फाट्याजवळ पुन्हा एकदा अपघात झाला असून एक कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात गेली आहे. सुदैवाने काही व्यक्तींना स्थानिक नागरिकांनी वाचविले असून अजून एक मुलगी बुडालेल्या कारमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरिक, वेल्हे पोलीस घटनास्थळी असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत आहेत.

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक आयट्वेंटी कार पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण फाट्याजवळ थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात गेली. सायंकाळची वेळ असल्याने वाहनांची वर्दळ होती, तसेच आजूबाजूला स्थानिक नागरिकही होते. कार पाण्यात गेल्याचे पाहून स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. नागरिकांनी पाण्यात उड्या घेऊन तीन ते चार व्यक्तींना बाहेर काढले असून, दुर्दैवाने अजूनही एक मुलगी कारमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल होत असल्याची माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांनी दिली आहे.

सध्या बचावकार्य सुरू असून त्यानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल असे वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रणजित पठारे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT