accident.jpg 
पुणे

कांद्याचा ट्रक पुलावरून कोसळून अपघात; चालक गंभीर जखमी

भाऊ म्हाळस्कर

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ कांद्याची वाहतूक करणारा ट्रक पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. गुरुवारी (ता.01) सकाळी ही घटना घडली. अपघातानंतर जुन्या महामार्गावर कांद्याचा सडा पडला होता.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने कांदा घेऊन निघालेल्या ट्रकच्या चालकाचे द्रुतगती मार्गावर लोणवळ्याजवळील वलवन येथे तीव्र वेग आणि वळणामुळे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक मार्गावरील दुभाजकास सुमारे शंभर मीटर अंतर घासत जात द्रुतगती मार्गाच्या दोन मार्गिकांमधून सुमारे तीस फूट खाली खोल खाली महामार्गावर कोसळला. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर महामार्गावर कांद्याचा खच पडला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा, आयआरबी कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालकास सोमटने येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयआरबी च्या कर्मचाऱ्यांनी रास्ता साफ करत वाहतुकीतील अडथळा दूर केला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता.

'इथे माणूसकीही ओशाळली'
कांद्याचा ट्रक महामार्गावर कोसळल्याने मार्गावर कांद्याचा सडा पडला होता. तर दुसरीकडे ट्रक चालक गंभीर जखमी झाला होता. नागरिकांची मात्र कांदा घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. अपघातग्रस्त चालकास मदत करण्याऐवजी स्थानिक, महामार्गावर येजा करणाऱ्या वाहन चालक व अन्य नागरिकांनीही कांद्यावर हात साफ करत कांद्याची पोतीच्या पोती लंपास केली. त्यामुळे इथे माणूसकीही ओशाळली असल्याचा प्रत्यय आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT