पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावर भांडगावात परिसरात चार वाहनांचा विचित्र अपघात

रमेश वत्रे

केडगाव (पुणे)  ः पुणे-सोलापूर महामार्गावर भांडगाव (ता. दौंड) येथे टँकरने मोटारीला धडल्याने चार वाहनांचा शुक्रवारी दुपारी विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. सर्वाधिक नुकसान झालेल्या होंडा सिटी मोटारीतील एअरबॅग उघडल्याने चालक बचावला.

महामार्गावर भांडगाव येथे लेन मार्किंगचे काम चालू असल्याने एक लेन बंद करण्यात येऊन एकाच लेनमधून वाहतूक चालू होती. भांडगावातील गतीरोधकामुळे वाहने सावकाश व थांबत थांबत पुढे सरकत होती. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास गतीरोधकाजवळ तीन मोटारी उभ्या असताना गॅस टँकरने (KA01AG6951)  एका होंडा सिटी मोटारीला (MH04FF1060) पाठीमागून जोराची धडक दिली.

वेगाने धडक दिल्याने होंडासीटीसह पुढील तीनही मोटारी एकमेकांवर आदळल्या. अपघातांनंतर टँकर चालक पळून गेला. तीन मोटारीत एकूण दहा ते बारा प्रवासी होते. यात महिलांची संख्या जास्त असल्याने अपघातानंतर त्यांनी मोठा आक्रोश केला. होंडा सिटी व मारूती मोटारीचे दोन्ही बाजूने नुकसान झाले आहे.

म्हाडाच्या ५६४७ सदनिकांची आज Online सोडत; कोणाचं गृहस्वप्न होणार साकार? 
याबाबत होंडा सिटीचालक विष्णूप्रासद मिश्रा म्हणाले, टँकर वेगात होता. सिटबेल्ट लावल्याने एअरबॅग उघडल्या गेल्या व  मी बचावलो. मोटारीला जोराची धडक बसल्याने दरवाजे उघडत नव्हते. ग्रामस्थांनी मला काचा फोडून बाहेर काढले. महामार्ग पोलिसांनी वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. यवत पोलिस पुढील तपास करीत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT