सरदवाडी ( ता. शिरूर) - पुणे - नगर रस्त्यालगत गॅस पाईपलाईन साठी चालू असलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर बॅरिकेडस ठेवले असून, धोकादायक पद्धतीने चालू असलेल्या या कामामुळे काल सायंकाळी अपघात होऊन दूचाकीचालकाचा बळी गेला. 
पुणे

खोदकाम चालू असताना जेसीबी रस्त्यावर आला; अन्.....

नितीन बारवकर

शिरूर - गॅस पाईपलाईनसाठी रस्त्याकडेला भर पावसात खोदकाम चालू असताना कामातील जेसीबी रस्त्यावर आला, त्यामुळे भरधाव जाणारा कंटेनर अचानक थांबला. त्याचवेळी मागून येणारा दूचाकीस्वार कंटेनर वर आदळला. त्यात दूचाकीवरील एकाचा जीव गेला; तर मागे बसलेल्याचा एक  पाय निकामी झाला.

काल (ता. दहा) सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात लक्ष्मण रावसाहेब गुंजाळ (वय तीस) हा मृत्युमूखी पडला; तर मागे बसलेला त्याचा मित्र गणेश बबन येवले (वय तीस, दोघे रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर, जि. नगर) हा गंभीर जखमी झाला. या अपघातात गणेशचा एक पाय निकामी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार : मृत लक्ष्मण गुंजाळ व गणेश येवले हे दोघे मित्र असून, गणेश हा काही दिवसांपासून कामानिमीत्त कारेगाव (ता. शिरूर) येथे राहात होता. बरेच दिवस मित्राची भेट नाही म्हणून लक्ष्मण हा काल (ता. १०) सकाळी अकराच्या सुमारास आपल्या दूचाकीवरून (क्र. एमएच १६ एक्यू ३५०५) त्याला भेटायला कारेगाव येथे आला होता. दिवसभर कारेगावात थांबल्यावर सायंकाळी दोघेही मूळ गावी दैठणे गुंजाळ येथे जाण्यासाठी निघाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कारेगाव येथून निघताना पाऊस पडत होता. ते पुणे - नगर रस्त्याने सरदवाडीजवळ आले असता, पुढे जाणारा कंटेनर (क्र. एनएल ०१ एडी ५२३०) अचानक रस्त्यात थांबल्याने गुंजाळ यांचे दूचाकीवरील नियंत्रण सुटले. कंटेनरच्या डाव्या बाजूने त्यांना जाता आले असते, तथापि गॅस पाईपलाईनसाठी रस्त्यालगत मोठा खड्डा खोदलेला असल्याने ते कंटेनरवर जाऊन आदळले. यात डोक्याला गंभीर मार लागल्याने लक्ष्मण गुंजाळ याचा जागीच मृत्यु झाला; तर मागे बसलेल्या गणेश येवले याच्या दोन्ही पायांना जबर मार लागला. एका पायाचा चेंदामेंदा झाल्याने तो निकामी झाला. सरदवाडी येथील विठ्ठल - रूक्मिणी मंदिराजवळ हा अपघात झाला. 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, केवळ रस्त्याकडेला खोदलेल्या खड्ड्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी अहवालात नमूद केले आहे. खड्ड्याच्या बाजूला लावलेले बॅरीकेडस् बरेचसे रस्त्यात आले होते. त्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिस सूत्रांनी वर्तविला आहे. 

दरम्यान, गॅस पाईपलाईनचे काम करणा-या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाला असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार यांनी केला. या अपघाताची गांभीर्यपूर्वक व बारकाईने चौकशी करावी, जबाबदार असलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा आणि अपघातात हकनाक बळी गेलेल्या तरूणाच्या कुटूंबाला नुकसान भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. भर पावसात असे कुठले महत्वाचे काम चालू होते, तेथे खबरदारीच्या उपाययोजना केल्या होत्या का, रस्त्यापासून काही अंतर सोडून खोदकाम करावे असा नियम आहे तो नियम पाळला होता का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT