accident  sakal
पुणे

Accident News : पोलिस कर्मचारी संदीप कदम यांचा अपघातात मृत्यू...

संदीप कदम यांनी बारामती शहर तसेच जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात काम केलेले आहे.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती - पुणे ग्रामीण पोलिस दलाअंतर्गत पाटस पोलिस चौकीत कार्यरत असलेले मूळचे बारामतीकर संदीप जगन्नाथ कदम यांचे आज निधन झाले. शुक्रवारी (ता. 22) फिरायला निघालेले असताना पाठीमागून आलेल्या तीन चाकी टेंपोने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र आज त्यांचे निधन झाले.

संदीप कदम यांनी बारामती शहर तसेच जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात काम केलेले आहे. सध्या ते पाटस पोलिस चौकीत कार्यरत होते. अनेक गुन्ह्यांच्या उकलीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. अतिशय धाडसी पोलिस कर्मचारी म्हणून त्यांची पोलिस दलात ओळख होती.

या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्या मध्ये संदीप कदम हे रस्त्याच्या कडेने जाताना मागून आलेल्या टेंपोने त्यांना जोरदार धडक दिल्याचे दिसत आहे. हा अपघात होता की घातपात आहे, या बाबत पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी होत आहे. संदीप कदम यांनी अनेक गुन्ह्यांची उकल करत अनेक गुन्हेगारांना गजाआड केलेले होते, गुन्हे शोध पथकात काम करताना त्यांची कामगिरी चमकदार होती, या पार्श्वभूमीवर हा अपघात की घातपात याची चर्चा बारामती सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील : जयंत पाटील

Bigg Boss Marathi 6 Live Update: रितेश देशमुखच्या सहकलाकार अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT