पुणे

Video : कात्रज घाटात अपघात; वाहनांच्या रांगा

सकाळवृत्तसेवा

खेड-शिवापूर : जुन्या कात्रज घाटात गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पीएमपी बस, एसटी बस आणि छोटा टेम्पो यांचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या अपघातामुळे कात्रज घाट रस्त्यावर दोन्ही बाजूला सुमारे एक तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कात्रज घाटातून एक छोटा टेम्पो साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. घाट रस्त्यावरील एका वळणावर छोटा टेम्पोने एसटी बसला ओव्हरटेक करुन पुढे निघाला होता. यावेळी पुण्याच्या दिशेने निघालेल्या पीएमपी बसची टेम्पोला समोरून धडक बसली. तर पाठीमागून येणाऱ्या एसटी बसची टेम्पोला पाठीमागून धडक बसली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही; मात्र तीन वाहनांचे नुकसान झाले. तर तीन वाहनांचा अपघात झाल्याने पूर्ण रस्ता बंद झाला. त्यामुळे कात्रज घाट रस्त्यावर दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना बराच वेळ या वाहतूक कोंडीत अडकावे लागल्याने त्यांची गैरसोय झाली. 

अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात पोलिसांनी अपघातातील वाहने बाजूला घेतली. त्यानंतर सुमारे एक तासाने घाट रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.

याबाबत भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विष्णु पवार म्हणाले, "या अपघातात कोणाला दुखापत झालेली नाही. अपघातानंतर ताबडतोब घटनास्थळी जाऊन अपघातातील वाहने बाजूला घेण्यात आली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Rule Changes: लोनशी संबंधित हे 4 नियम आजपासून बदलले! CIBIL स्कोरमध्ये मोठा बदल; आता या गोष्टींसाठी चार्ज नाही

Minor Girl Incident : नाशिक जिल्हा अश्लीलतेच्या चर्तेतून बाहेर जात नाही, खरातनंतर खासगी व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलीबाबत उचललं चुकीचं पाऊल

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : पुण्यात अनधिकृत केबल्सवर कारवाई; पालिकेची धडक मोहीम सुरू

SCROLL FOR NEXT