पुणे

Pune Accident : पुण्यातल्या भूमकर पुलावर अपघात; ट्रकने कारला दीड किलोमीटर फरफटत नेलं

सकाळ वृत्तसेवा

विठ्ठल तांबे

धायरी : मुंबई-बंगळुरू महामार्गावर  भूमकर पुलावर शनिवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाच गाड्यांना ट्रकने धडक देत यातील एका कारला दीड किलो मीटर फरपटत नेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या अपघातात चार जण जखमी असून त्यांना जवळील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ट्रकने एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला धडक देऊन पुढे क्रश भरून चाललेल्या टिप्परला धडक दिली. या अपघातात एक पिकअप व एका कारला उजव्या बाजूने जोरदार धडक बसली. हा अपघात झाला त्यानंतर ट्रक चालकाने बाजूने जात असलेल्या एका कारला ट्रकच्या समोरील बाजूने धडक देऊन कारला जवळपास दीड किलोमीटर फरफटत नेले.

घटनास्थळी सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, सिंहगड वाहतूक पोलिस तसेच भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस, राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंगचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघात झालेली वाहने बाजूला घेण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT