accident two died after their car crashed in Neera Deoghar Dam one injured police Sakal
पुणे

Bhor News : नीरा देवघर धरणामध्ये मोटार कोसळून दोघांचा मृत्यू

भोर-महाड मार्गावरील वरंध घाटात शिरगाव येथे नीरा देवघर धरणाच्या पाण्यात पर्यटकांची मोटार कोसळली

सकाळ वृत्तसेवा

भोर : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव येथे नीरा देवघर धरणाच्या पाण्यात पर्यटकांची मोटार कोसळली. त्यात बुडून एका तरुणीसह दोघांचा मृत्यू झाला; तर एकजण जखमी तर एकजण बेपत्ता आहे.

शनिवारी (ता. २९) सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अक्षय रमेश धाडे (वय २८, रा. रावेत, पुणे) आणि हर्षप्रीत हरप्रितसिंग बांबा (रा. पुणे, मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश), असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. स्वप्नील परशुराम शिंदे (वय २८, रा. तुकाईनगर-हडपसर, पुणे) हा बेपत्ता आहे.

तर, त्यांच्यासोबत असलेला संकेत विरेश जोशी (वय २६, रा. बाणेर, पुणे) हा जखमी झाला आहे. पुण्यात आयटी कंपनीमध्ये काम करणारे चौघेजण शनिवारी सकाळी मारुती बलेनो मोटारीने (क्र. एम.एच. १२ एच.डी. ३९८४) भोर परिसरात फिरण्यासाठी आले होते.

वरंधा घाटात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असूनही सकाळी ते भोर-निगुडघर मार्गे वरंधा घाटत गेले. साडेआठच्या सुमारास वारवंड आणि शिरगाव या गावांच्या दरम्यान वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार सुमारे अडीचशे फूट खोल नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कोसळली. त्यावेळी संकेत जोशी हा मोटारीबाहेर फेकला गेल्याने वाचला.

परंतु, इतर तिघे पाण्यात बुडाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दुपारी एकच्या सुमारास मोटारीतील अक्षय धाडे आणि हर्षप्रीत यांचे मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. परंतु, स्वप्नील याचा शोध लागला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होता.

संसाराचे स्वप्न अपूर्णच

नीरा देवघर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेले अक्षय आणि हर्षप्रीत या दोघांचा साखरपुडा झाला असून, लवकरच ते लग्न करणार होते. मात्र, दोघांचाही अपघाती मृत्यू झाल्याने त्यांचे संसाराचे स्वप्न अपूर्णच राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT