accident mumbai esakal
पुणे

Accident: भोर-कापूरव्होळ मार्गावर डंपरने चिरडल्याने महिलेचा मृत्यू!

विजय जाधव ः सकाळ वृत्तसेवा

कापूरहोळ-भोर मार्गावरील नेकलेस पॉईंटच्या उतारावरील संमगनेर गावच्या हद्दीतील रस्त्यावर डंपरने चिरडल्याने महिलेचा मृत्यु झाला तर तिचा मुलगा थोड़क्यात बचावला.

लताबाई गोपाळ येलमकर (वय ६५, रा. उंदेरी, ता. महाड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून सोमवारी (ता.१५) सकाळी ९ वाजता नेकलेस पॉईंटवरून भोरच्या बाजूला असलेल्या उतरावावर हा उपघात झाला.

सुदैवाने लताबाईंचा मुलगा अविनाश येलमकर (वय ३९) हा थोडक्यात बचावला. कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी या मार्गाच्या रस्त्याच्या दुरूस्तीचे व विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. त्याची खडी रस्त्यावर पडल्यामुळे आणि ठेकेदाराने सुरक्षीततेच्या उयायोजना न केल्यामुळे महिलेचा जीव गेला आहे.

याबाबत राजगड पोलिसांनी दिलेली माहिती अशी अविनाश येलमकर आपल्या कुटुंबासह खडकवासला (पुणे) येथे कामानिमित्त राहात आहेत. मकरसंक्रांतीच्या सणासाठी ते मूळगाव असलेल्या उंदेरी (ता.महाड, जि.रायगड) येथे आईसमवेत दुचाकीवरून जात होते. सकाळी नऊच्या सुमारास नेकलेस पॉईटच्या उताराला रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे त्यांची दुचाकी घसरली आणि दोघेही रस्त्यावर पडले.

त्यावेळी समोरून रस्त्याच्या कामासाठी असलेला डंपर येत होता. चढ असूनही डंपरचा वेग जास्त असल्यामुळे लताबाई यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला तर अविनाश थोडक्यात वाचले.

अपघातानंतर डंपरचालक आणि रस्त्यावर काम करणारे कामगारही पळून गेले. त्यामुळे अपघातग्रस्तांना लगेच उपचार मिळाले नाहीत. घटनेची माहिती मिळताच किकवी दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार राजेंद्र चव्हाण, तुळशीराम अहिरे, दिलीप अलगुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ड़ॉक्टरांनी लताबाईंना मृत घोषीत केले.

ठेकेदाराचे सुरक्षीततेच्या नियमांकडे दुर्लक्ष

कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी-वाई-सुरुर या रस्त्याच्या क्रॉक्रीटीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. सद्यस्थितीत मांढरदेवीच्या यात्रेला जाणा-या भाविकांमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी आहे. मात्र ठेकेदाराने सुरक्षीततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नाहीत. शिवाय रस्त्यावर धूळीचे साम्राज्य नेहमीच असते. मागील आठवड्यात खासदार सुप्रिया सुळे यांनीही सार्वजनिक बांधकांम विभागाच्या अधिका-यांना सुरक्षीततेच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT