Pune News sakal
पुणे

Pune News : गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीची आत्महत्या

गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना

रवींद्र पाटे

नारायणगाव : गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना धोंडकरवाडी(ता. जुन्नर) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. नादुरुस्त रस्ता व अवजड वाहतूक यामुळे आठ महिन्यापूर्वी प्रेम विवाह करून सुखी संसाराची स्वप्ने पहात असलेले एक कुटुंब उधवस्त झाले आहे.

या घटनेमुळे आता तरी शासनाला जाग येणार का?रस्त्यांची दुरूस्ती होणार का? ट्रॅक्टरद्वारला दोन ट्रॉल्या जोडून सुरू असलेली नियमबाह्य ऊस, मुरूम, मळी वाहतूक बंद होणार का ? असा सवाल सर्व सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.पत्नीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने रमेश नवनाथ कानसकर (वय २९, राहणार धोंडकरवाडी , निमदरी ता.जुन्नर ) या तरुणाने आज पहाटे विषारी औषध पिऊनजीवनयात्रा संपवली.

धोंडकरवाडी येथील रमेश कानसकर

यांचा ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत जमिनीचे सपाटीकरण करण्याचा व्यवसाय होता.आठ महिन्या पूर्वी विद्या जाधव (वय २२) हिच्या बरोबर त्याचा प्रेम विवाह झाला होता.विद्या ही चार महिन्यांची गर्भवती होती.१४ ऑक्टोबर २०२२ रोजी रमेश कानसकर हे धोंडकरवाडी येथून दुचाकीवरून पत्नी व सासू यांना घेऊन नारायणगाव येथे खरेदीसाठी आले होते.

पुन्हा घरी जात असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वारुळवाडी(ता.जुन्नर) येथे समोरून ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का दुचाकीला बसला. या मुळे विद्या खाली पडून तिच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूमुळे रमेश कानसकर हे मानसिक तणावाखाली होते.

मागील तीन दिवसा पासून त्यांनी अन्न व पाण्याचा त्याग केला होता. अखेर आज पहाटे त्यांनी राहत्या घरात विषारी औषध घेतले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना जुन्नर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. या घटने मुळे हळहळ व्यक्त होत असून अपघातामुळे आठ महिन्यांपूर्वी संसार सुरू केलेल्या दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT