accidental death of worker boy after iron road fell on his head from construction site baner Sakal
पुणे

Pune News : बाणेर येथे बांधकामावरून सळईचा गट्टू डोक्यात पडून मुलाचा अपघाती मृत्यु

बांधकाम व्यावसायिक, साईट इंजिनियर, तसेच बांधकामावरील कामगार यांच्यावर चतु:र्श्रुंगी पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतल बर्गे

बालेवाडी : बाणेर येथील गणराज चौक जवळ ' केतन वीरा' बांधकाम व्यावसायिकाचे' बांधकाम सूरु असताना रूद्र राऊत (वय -९ ) या लहान मुलाच्या डोक्यात बिल्डिंग वरून सळईचा गट्टू पडून अपघात झाला व यात त्याचा मृत्यु झाला.

संबंधित बांधकाम व्यावसायिक, साईट इंजिनियर, तसेच बांधकामावरील कामगार यांच्यावर चतु:र्श्रुंगी पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाणेर येथे गणराज चौका जवळ बाणेर महाळूंगे मुख्य रस्त्यालगत' केतन वीरा ' या बांधकाम व्यावसायिकाचे बांधकाम सुरू आहे. ( ता. २२ नोव्हेंबर ) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान या बिल्डिंगच्या पहाडाचे काम सुरू असताना या इमारती वरून सळईचा गट्टू मुख्य रस्त्यावर पडला.

जवळच असणाऱ्या ' द ऑर्किड स्कूल 'या शाळेमध्ये शिकत असणारा रुद्र केतन राऊत (वय-९) रा. विरभद्र नगर बाणेर, हा तिथून जात असताना त्याच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला, जुपिटर हॉस्पिटल मध्ये उपचार करताना उपचारा दरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. संबंधित बांधकाम व्यावसायिक व साईट इंजिनियर, बांधकामावरील कामगार यांच्यावर चतु:र्श्रुंगी पोलीस चौकीत गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.

एका बांधकाम व्यावसायिकाच्या हलगर्जी पणापुळे एका निष्पाप लहान मुलाचा बळी गेल्याने परीसरात नागरीक हळहळ व्यक्त करीत आहेत. तसेच ही इमारत अगदी पदपथाला लागूनच असुन या इमारतीच्या बांधकामास परवानगी कशी दिली गेली? याबाबत नागरीक आपआपसात चर्चा करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 विश्वचषक 2026 प्रसारणावरून गोंधळ; ICCचा मोठा खुलासा, JioStar करार मोडल्याच्या अफवा फेटाळल्या

UPSC Exam: ‘यूपीएससी’चा मोठा निर्णय! 'या' उमेदवारांना मिळणार सोयीनुसार परीक्षा केंद्र

Pune Marathon : मॅरेथॉन दिवशी विद्यापीठात वाहनबंधी; धावपटूंसाठी विशेष शटल बस व पार्किंगची स्वतंत्र सोय!

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

SCROLL FOR NEXT