Accidental death two-wheeler rider Pune-Solapur National Highway indapur
Accidental death two-wheeler rider Pune-Solapur National Highway indapur sakal
पुणे

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी स्वाराचा अपघाती मृत्यू

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी देवकर ( ता. इंदापूर) गावचे हद्दीत महामार्गावरून यावली (ता. मोहोळ) कडे निघालेल्या दुचाकीस पाठीमागून आलेल्या दोस्त टेम्पोने जोरदार धडक दिल्याने मनोज कांचन ( वय ३१, रा. उरुळी कांचन ता. हवेली ) या दुचाकीस्वार युवकाचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात दि. १२ मे रोजी झाला असून याबाबत मयत युवकाचा मावस भाऊ राहुल शंकर मेमाणे ( वय ५२, रा.कोरेगाव मुळ, इनामदार वस्ती, ता.हवेली, जि.पुणे ) यांनी टेम्पो चालक अनिल कविराज राऊत ( रा.जळकोट,जि.लातूर )यांच्या विरूद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मनोज कांचन हे दुचाकी वरून सोलापूर दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव टेंपोने (क्र. एम.ऊच.१४,जीडी ८५१४ ) त्यांच्या दुचाकीस धडक दिल्याने मनोज कांचन यांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर टेम्पोपाठीमागून आलेल्या तसेच सोलापूर दिशेने जाणाऱ्या लक्झरी बस ( क्र.एम.एच.११,सी.एच.६६७६ )खाली दुचाकी अडकून रस्त्याने फरफटत गेल्याने घर्षण होवून दुचाकी व लक्झरी बसने पेट घेतला.त्यात दोन्ही वाहने जागेवर जळून खाक झाली.सुदैवाने लक्झरीने पेट घेतल्यानंतर गाडीचालकाने प्रसंग वधान राखून बस रस्त्याच्या कडेला नेवून सर्व प्रवाशांना गाडीतून सुखरूप खाली उतरवल्याने जीवितहानी झाली नाही मात्र प्रवाशांचे सामान, साहित्य जळून खाक झाल्याने वित्तहानी झाली. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

OYO IPO: लवकरच येणार ओयोचा आयपीओ; सेबीकडे पुन्हा कागदपत्र जमा करण्याच्या तयारीत

Virat Kohli on Chris Gayle : RCBमध्ये पुन्हा एकदा एंट्री करणार युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल? विराट कोहलीने दिली ऑफर

Healthy Diet For Kids : मुलांच्या निरोगी वाढीसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, मिळतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT