accused absconding pune  sakal
पुणे

Crime News : मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातून तपासासाठी खानापूर येथे आणलेला 'मोका'तील आरोपी पुणे पोलीसांच्या हातातून पसार

शहर व ग्रामीण पोलीसांची रात्रभर धावपळ मात्र आरोपीचा थांगपत्ता लागेना; हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

निलेश बोरुडे

सिंहगड : पुणे शहरातील मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातून तपासासाठी खानापूर (ता. हवेली) येथे आणलेला 'मोका'सह इतर गंभीर गुन्ह्यांतील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे.

संतोष बाळू पवार (वय 23,रा. जुन्या मराठी शाळेजवळ, खानापूर ता. हवेली) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव असून हातातून आरोपी पळून गेल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान आरोपी पसार झाल्याने शहर व ग्रामीण पोलीसांची धावाधाव सुरू असून परिसरात खळबळ माजली आहे. आरोपी संतोष पवार व त्याच्या इतर साथीदारांवर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

यापुर्वीही या टोळीतील सदस्यांनी गंभीर गुन्हे केलेले असल्याने त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान काल सायंकाळी (दि.1फेब्रुवारी) सायंकाळी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे व इतर दोन पोलीस कर्मचारी आरोपी संतोष पवार व साई कुंभार यांना घेऊन खानापूर येथील त्यांच्या घरी आले होते.

सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरोपी संतोष पवार व त्याच्या गावातील इतर साथीदारांनी अचानक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. झटापटीत संतोष पवार हातातील बेडीसह पोलीसांच्या हातातून निसटून पसार असून त्याला मदत करणारे साथीदारही फरार झाले आहेत.

आरोपी पळाल्यानंतर गोंधळलेल्या पोलीसांनी परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही हाती लागले नाही. शहर पोलीसांचा मोठा ताफा खानापूर येथे शोधाशोध करत होता मात्र अंधार व जंगलाचा फायदा घेऊन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. अखेर याबाबत आज पहाटे हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम अधिक तपास करत आहेत.

पोलीस गाफील कसे?....... आरोपी संतोष पवार याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली असताना त्याला गावात घेऊन येताना पुरेसे पोलीस कर्मचारी का आणण्यात आले नाहीत? अपुरे मनुष्यबळ सोबत असताना सायंकाळची वेळ आरोपीला घेऊन तपास करण्याची का निवडण्यात आली?

स्थानिक पोलीसांची मदत का घेण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून गंभीर गुन्ह्याचा तपास करताना व आरोपी हाताळताना पोलीस गाफील राहिले असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT