Crime sakal
पुणे

Pune Crime : माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणारा गजाआड

येरवड्यातील क्रिएटीसिटी मॉलमधील एका फर्निचर कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्यास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केली अटक.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - येरवड्यातील क्रिएटीसिटी मॉलमधील एका फर्निचर कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्यास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेखर मारुती लोंढे (वय ३७, रा. नागपूर चाळ पोलिस चौकीसमोर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत क्रिएटीसिटी मॉलमधील फर्निचर कंपनीमधील कर्मचाऱ्याने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर लोंढेने माथाडीच्या नावाखाली कंपनीच्या वेअर हाऊसमधून आलेले ट्रकमधील फर्निचर कंपनीच्या कामगारांना उतरवून घेण्यास अडवणूक केली.

आम्ही स्थानिक आहोत, असे सांगून कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे दर महिन्याला १८ हजार रुपयांची मागणी केली. तसेच, कंपनीचे हाऊसकिंपींग आणि कामगारांचे कंत्राट न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार खंडणी विरोधी पथक-२ यांच्याकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.

त्यावेळी आरोपी लोंढे याच्याकडे कंपनीची माथाडी संदर्भात कोणतीही वर्क ऑर्डर नाही. माथाडी बोर्डाकडे कामगाराची नोंद नसताना तो माथाडीच्या नावाखाली धमकावत होता. तसेच, यापूर्वी आरोपीने तक्रारदाराला धमकावून १२ हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपी लोंढे याच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेखर लोंढे सध्या पोलिस कोठडीत आहे.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलिस कर्मचारी विजय गुरव, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाणे, चेतन चव्हाण, चेतन शिरोळकर यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT