Arrested Sakal
पुणे

शेतकऱ्याची आर्थिक फसवणुक करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस अटक

वेल्हे तालुक्यातील निवी गावातील शेतकऱ्याची आर्थिक फसवणुक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हातील आरोपीला वेल्हे पोलिसांनी चोवीस तासात अटक केली.

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) - वेल्हे तालुक्यातील निवी गावातील शेतकऱ्याची आर्थिक फसवणुक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हातील आरोपीला वेल्हे पोलिसांनी चोवीस तासात अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती वेल्हेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.

दत्ता दगडू गोरे वय ४८ (रा. रा. निवी, ता. वेल्हे, जि- पुणे. सध्या रा. वडगाव बुद्रुक, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी संतोष सुरेश जोगडे (वय २५) वर्षे, धंदा-नोकरी, रा. मुळ रा. निवी, ता. वेल्हे, जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादीचे मयत वडील सुरेश बाळू जोगडे ५१ वर्ष, यांची आरोपी दत्ता दगडू गोरे याने फसवणूक करून घेतलेले बँकेच्या खात्यावरील रोख रक्कम ५०००० हजार रुपये व एन एफ टी द्वारे स्वतःचे अकाउंटवर ट्रान्सफर केलेली रक्कम २७०००० रुपये असे एकूण ३,२०,००० रुपयांची फसवणूक केली.

त्या रकमेची फिर्यादी व त्यांचे वडीलांनी त्यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली. परंतु आरोपीने त्यांचे पैसे परत न देता तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.

या मानसिक तणावाखाली येऊन फिर्यादीच्या वडिलांनी त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेला आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे, त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुदाम बांदल व महेश कदम अधिक तपास करत आहे .

वेल्हे तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे घटना वारंवार होत असल्याच्या प्रकार समोर येत असून स्थानिक नागरिक व गरीब शेतकरी पार्टीवले व इस्टेट एजंटांच्या दहशती विरुद्ध तक्रार दाखल करण्यास समोर येत नसून अश्या प्रकारचा अन्याय कोणत्या शेतकऱ्यांनवर झाला असल्यास त्यांनी वेल्हे पोलीस स्टेशन शी संपर्क साधण्याचे आवाहन वेलेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Government Employees Salary : केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांना दिलासा; २५ सप्टेंबरलाच वेतन-पेन्शन जमा होणार

Bank Update: रविवारीही बँका राहणार सुरू! सरकार आणि RBIचा मोठा निर्णय

Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

गणपती विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; दीपक वागसकर यांचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप | Ahilyanagar, Bhingar

Vivo Smartphone: 10,000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्लेसह येतोय Vivo S2 FE 5G; पाहा दमदार फीचर्स अन् किंमत...

SCROLL FOR NEXT