junnar  
पुणे

घरफोडींतील आरोपीच्या पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या  

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर पोलिसांना दोन घरफोडीत हवा असणाऱ्या आरोपीस पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. 1) गस्तीदरम्यान अटक केली आहे. 

दिलीप नारायण केदार वय 25, रा. पिराचीवाडी- निमदरी, ता. जुन्नर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने दोन घरफोडीत सुमारे एक लाख 4 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरला होता. पारुंडे (ता. जुन्नर) येथील आतिष पुंडे व जितेंद्र पुंडे यांच्या घरात घुसून अनुक्रमे 67 हजार व 38 हजार चारशे रुपये किमतीचे तीन मोबाईल संच, चार्जर, पॉवर बँक, असा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी जुन्नर पोलिस आरोपीच्या शोधात होते. त्याला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. 1) गस्तीदरम्यान अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटेना
  
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार दत्तात्रेय जगताप, पोलिस नाईक दीपक साबळे, चंद्रकांत जाधव, पोलिस हवालदार शरद बांबळे, शंकर जम, काशीनाथ राजपुरे, रौफ इनामदार यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS-MVA Morcha: लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ आली, शरद पवारांचे आवाहन

Mutual Fund : गेल्या 5 वर्षांत 20% पेक्षा जास्त रिटर्न देणारे टॉप लार्ज-कॅप म्युच्युअल फंड; पहा किती रिटर्न दिला!

Mumbai Morcha: मतदारयादी घोटाळा की मोठा राजकीय कट? ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावाने बनावट अर्ज दाखल, Uddhav Thackeray म्हणाले...

Latest Marathi News Live Update : ऊस दराच्या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका

Raj Thackeray : पुरावा कुठाय विचारता ना? हे घ्या! राज ठाकरेंनी फक्त आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला...

SCROLL FOR NEXT