पोलिस कोठडी
पोलिस कोठडी sakal
पुणे

शिरूर पोलिस ठाण्याची कोठडी फोडून आरोपीचे पलायन

नितीन बारवकर

शिरूर - घरफोडी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने चक्क शिरूर पोलिस ठाण्याची कोठडी फोडून पलायन केल्याचा प्रकार आज पहाटे उघडकीस आला. याप्रकरणी दोघांविरूद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिरूर पोलिस ठाण्याची कोठडी फुटून आरोपी पळून जाण्याचा हा तिसरा प्रकार आहे.

रेवण उर्फ रोहन उर्फ बंटी बिरू सोनटक्के (वय २२, रा. वारजे माळवाडी, पुणे) असे कोठडीतून पळून गेलेल्या तरूणाचे नाव असून, त्याच्यासह त्याला पळून जाण्यास मदत करणारा अक्षय काळे (रा. चिचोंडी पाटील, ता. जि. नगर) या दोघांवर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार : रेवण सोनटक्के याला शिक्रापूर येथे घरफोडी करताना शिक्रापूर पोलिसांनी पकडले होते. त्याला शिरूर न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याने कालपासून त्याला शिरूर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. शिरूर च्या पोलिस कोठडीतील आरोपी हे पुढच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत झोपलेले असताना, मुख्य कोठडीच्या खोलीत असलेल्या स्वच्छता गृहात जात असल्याचा बहाणा करून सोनटक्के हा कोठडीतील खोलील गेला व तेथे त्याने छताची कौले काढून पोबारा केला.

पहाटे सव्वादोनच्या सुमारास घडलेला हा प्रकार सकाळी सहा वाजता लॉकअप गार्डची ड्युटी बदलत असताना उघडकीस आला. पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणा तपासल्यानंतर पळून गेलेल्या सोनटक्केबरोबरच त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी काळे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी घटनास्थळी भेट दिली. शिरूर पोलिस ठाण्याची इमारत व कोठडीची इमारत जुनी व जीर्ण झाली असून, छतही खिळखिळे झाले होते. त्याचाच गैरफायदा घेत आरोपीने कौले उचकटून पलायन केल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीच्या मागावर पोलिस पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT