accused in crime of theft ended commit suicide in vishram bagh police lockup in pune sakal
पुणे

Pune Crime : चोरीच्या गुन्ह्यात अटक; फरासखाना पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये संपवले जीवन

आरोपी शिवाजी गरड याला चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - फरासखाना पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. १८) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे.

शिवाजी उत्तम गरड (वय २४, रा. हडपसर) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने त्याला हडपसर परिसरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. न्यायालयाने त्याला १२ मे ते १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला फरासखाना पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले होते.

तेथील सुरक्षा रक्षकाला बुधवारी सकाळी सात वाजता पाहणीदरम्यान शिवाजी गरड याने गळफास घेतल्याचे आढळले. त्याने बेडशीट आणि चादरीची बाजूची पट्टी कापून त्याच्या साह्याने स्वच्छतागृहाच्या खिडकीला गळफास घेतला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार

आरोपी शिवाजी गरड हा मूळचा वाशीम येथील रहिवासी आहे. तो पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध एटीएम चोरी आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत, असे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजार कोसळला! 5 लाख कोटींचे नुकसान; मात्र हा शेअर 13% वाढला

Navi Mumbai: मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार! ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाच्या कामाला सुरूवात, कसा आहे मार्ग?

Vadgaon Sheri News : बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर; वडगाव शेरी आणि विमानतळ परिसरात पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

Agriculture News : तळवडेत कडक उन्हातही बाजरीचे पीक तरारले, शेतकऱ्यांचा वाढता कल; कमी पाणी अन् खर्चही कमी असल्याचा परिणाम

SCROLL FOR NEXT