Pune Crime 
पुणे

Pune Crime: कोर्टामध्ये नराधम ढसाढसा रडला; वानवडी अत्याचार प्रकरणी आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Accused in Wanwadi rape case remanded to police custody: आरोपीला ज्या गाडीतून आणलं जातं होतं, त्या ताफ्यात सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कार्तिक पुजारी

Pune Wanwadi Crime News: वानवडी प्रकरणातील आरोपीला आज पुणे कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपीला ज्या गाडीतून आणलं जातं होतं, त्या ताफ्यात सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी संजय रेड्डीला कोर्टासमोर हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात होताच आरोपी ढसाढसा रडू लागला होता. सरकारी वकिलांनी यावेळी बाजू मांडताना म्हटलं की, दोन्ही मुली अल्पवयीन आहेत, त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. काल गुन्हा दाखल झाला आणि रात्री आरोपीला अटक केली आहे.आरोपीची वैद्यकीय चाचणी करायची आहे. हा प्रकार आरोपीने कुठे केला, कधी आणि का केला? हे जाणून घ्यायचं आहे.

आरोपीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टाला विनंती केली की आरोपीला कमी कोठडी देण्यात यावी. आरोपीचे वकील म्हणाले की, आरोपीची तपासणी करायची असेल तर एक किंवा दोन दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी होते. आरोपीला डायबिटीस आहे. त्यामुळे त्याला कमी कोठडी द्यावी. दोन्ही वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आरोपीला ८ ऑक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे राज्यात एकच संतापाची लाट उसळली होती. आता अशीच घटना पुण्यातील वानवडी येथे घडली आहे. या प्रकरणी पुणेकर आक्रमक झाले आहेत. आज दुपारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन फोडली आहे. याप्रकरणी पुण्यात तणाव निर्माण झाला आहे.

पुण्यात दोन शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यामुळे पुन्हा एकदा राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यावर महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांची प्रतिक्रिया दिली. त्यांनी याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Election : कोल्हापूर–इचलकरंजी महापालिकेत महायुतीवर शिक्कामोर्तब; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, निवडणूकची रणधुमाळी सुरू

D-Mart ची ऑफर खरी वाटली, पण अभिनेत्याला कळलंच नाही अन् खातं रिकामं झालं, वाचा नाहीतर तुमचा खिसाही होईल रिकामा

CM Yogi Adityanath: गोरखपूरला नव्या ओव्हरब्रिजची भेट! १३७.८३ कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण; सीएम योगींचा विरोधकांवर घणाघात

Putrda Ekadashi 2025: वर्षाच्या शेवटच्या एकादशीला, 'या' राशीच्या लोकांचे भाग्य होईल उज्वल, सुखसोयी वाढतील

Kolhapur Crime News : हुपरीत मुलानेच आई-वडिलांचा खून करण्याचं खर कारण आलं समोर, पहाटे पाणी भरत असलेल्या निरागस आईच्या गळ्यावर काच मारली अन्

SCROLL FOR NEXT