police 
पुणे

तो फोनवर बोलत बोलत गेला, पण पोलिसांची झाली पळापळा 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : खंडणी व अनैतिक संबंध प्रकरणातील एक संशयित आरोपी मोबाईलवर बोलत पोलिस ठाण्याबाहेर गेला आणि पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी त्याला पकडून आणले, मात्र तो मोबाईलवर बोलत सहज बाहेर गेला, का पळण्याच्या बेतात होता, याचा उलगडा मात्र झाला नाही.

संबंधित आरोपी व वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी असलेल्या त्याच्या भावासह एकूण चार जणांविरुद्ध खंडणी व एका ज्येष्ठ महिलेस मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या युवा आघाडीचा पुणे जिल्हा उपाध्यक्ष तथा वाळूचा व्यवसाय करणारा अमित ऊर्फ अमोल सखाराम सोनवणे (वय 34) याचे ओळखीतील तरुणाच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध होते. ते उघड झाल्यानंतर ती मागील नऊ महिन्यांपासून तरूणापासून वेगळी राहत होती. दरम्यान, अमित याने या तरुणास पत्नीला नांदवत नसल्याने लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

या प्रकरणी 29 एप्रिल रोजी अमित याच्याविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात तक्रार देऊन तरुण घरी परतला. त्यावेळी अमित सोनवणे, सुमीत ऊर्फ लखन सखाराम सोनवणे, मनोज सोनवणे व सखाराम सोनवणे (चौघेही रा. भीमनगर, दौंड) हे घरात शिरले. तेथे अमित सोनवणे याने तरुणास, तक्रार माघारी घेणे, पन्नास हजार रुपये देणे, पत्नीला नांदविण्यास घेऊन येणे, आदी मागण्या करीत बेदम मारहाण केली. या भांडणादरम्यान तरुणाच्या आजीला देखील अमित याने काठीने मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. 

दौंड पोलिसांनी या प्रकरणी अमित सोनवणे याला 30 एप्रिल रोजी पोलिस ठाण्यात आणून एका अधिकाऱ्याच्या कक्षात खाली बसविले होते. पोलिस त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांची तयारी करीत असताना अमित बाहेर निघून गेला. तो बाहेर गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांची पाचावर धारण बसली, परंतु तत्काळ त्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पकडून आणण्यात आले. 

या प्रकरणात अमित यास 2 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश असून, उर्वरित तीन आरोपी फरारी आहेत. फौजदार प्रकाश खरात या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Pune University Fake Degree: पुणे विद्यापीठातील बनावट बी.कॉम. पदवी प्रकरणात कर्मचारी रमेश मुखेकर ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत

Pune Voter List Revision: पुण्यात मतदार यादी पुनरीक्षणाचे फक्त ५५ टक्के काम; आठ दिवसांत उर्वरित ४५ टक्के पूर्ण करण्याचे प्रशासनास आव्हान

Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

SCROLL FOR NEXT