accused who robbed gold shop arrested within twelve hours pune police action Sakal
पुणे

Pune Crime News : सराफा दुकानावर दरोडा टाकणाऱ्या आरोपींना बारा तासांत अटक

गुन्हे शाखेच्या पथकांची कारवाई, सोन्याच्या दागिन्यांसह ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

Pune News : महम्मदवाडी परिसरातील सराफा दुकानावर दरोडा टाकणाऱ्या सात आरोपींना गुन्हे शाखेने बारा तासांत अटक केली. शहरात दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. आरोपींच्या ताब्यातून सहाशे ग्रॅम वजनाचे दागिने, दोन दुचाकी, मोटार, सहा मोबाईल असा सुमारे ४८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे (वय २०), सनी ऊर्फ आदित्य राजू गाडे (वय १९, दोघे रा. केळेवाडी, पौड रस्ता, कोथरूड), पियुष कल्पेश केदारी (वय १८, रा. येरवडा), ओंकार जगन वाल्हेकर (वय १९, रा. जयभवानी नगर, कोथरूड),

नारायण बाळू गवळी (वय २०, रा. टिळेकरनगर, कोंढवा रस्ता), मयूर चुन्नीलाल पटेल (वय ५३, रा. वानवडी), नासिर महमूद शेख (वय ३२, रा. वानवडी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पवळे, गाडे आणि पटेल यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महम्मदवाडी परिसरातील वाडकर मळा येथील ‘बीजेएस’ सराफा पेढीवर सात दरोडेखोरांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून सोन्याचे दागिने चोरी केले होते. शनिवारी (ता. १८) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी आरोपींना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर,

सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, क्रांतिकुमार पाटील, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, युनिट सहाचे पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT