pune.jpg
pune.jpg 
पुणे

भरणेवाडीत वनविभागाच्या हद्दीतील अतिक्रमणावर हातोडा

राजकुमार थोरात

वालचंदनगर : भरणेवाडी (ता.इंदापूर) परिसरामध्ये शेतकऱ्यांनी वनजमिनीवरती केलेले  ४३ एकर क्षेत्रावरील अतिक्रमण वनविभागाने जेसीबी मशिनच्या साहय्याने हटविण्यात आले. इंदापूर तालुक्यामध्ये वनविभागच्या माध्यमातुन वनजमिनीवरील केलेले अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरु आहे. हिंगणगाव, पळसदेव नंतर आज (सोमवार) भरणेवाडीमध्ये अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेचा तिसरा दिवस होता.

भरणेवाडी परिसरातील वनक्षेत्रालगतच्या अनेक शेतकऱ्यांनी वनजमिनीवरती अतिक्रमणे केली असून यामध्ये डाळिंब, मिरची यांच्यासह अनेक फळबागांची लागवड केली होती. पुणे विभागाच्या उपवनसंरक्षक श्री लक्ष्मी ए , साहय्यक वनसंरक्षक मधुकर तेलंग, इंदापूर तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अतिक्रमण काढण्याची माेहिम सुरु होती. भरणेवाडी परिसरातील सुमारे ४३ एकरावरती अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण काढण्यापूर्वी संबधित शेतकऱ्यांना नोटीसा दिल्या असून नकाशाची माहिती देवून व मोजणी करुन अतिक्रमण हटविण्यात येत होते.    

वनक्षेत्रावरील सर्व अतिक्रमण हटविणार
यासंदर्भात पुणे विभागाचे उपवन संरक्षक अधिकारी श्री लक्ष्मी ए यांनी सांगितले की, ''पुणे जिल्हामध्ये वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरु आहे. इंदापूर तालुक्यामध्ये आजपर्यंत १६९ एकर क्षेत्रावरती अतिक्रमण हटविण्यात आली असून जिल्हातील  उर्वरित क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्यात येणार अाहे.''
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT