police 
पुणे

पिंपरी : 'ते' सव्वाचारशे जण अन् पोलिस...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : "लॉकडाऊन' असतानाही सरकारी आदेशाचे उल्लंघन करीत विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच पिंपरी-चिंचवड शहराला कंटेन्मेंट झोन घोषित केल्याने प्रशासन अधिक सजग झाले आहे. बेशिस्त लोकांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सोमवारी (ता.20) एका दिवसात तब्बल सव्वा चारशे जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस होत असलेली वाढ चिंतेची बाब बनली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. सोमवारपासून महापालिका हद्द "कन्टेन्मेंट झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्‍यक कामांसाठीही नागरिक ठराविक वेळेतच घराबाहेर पडू शकतात. अन्यथा घराबाहेर पडण्यास पूर्णपणे मनाई आहे. तरीही अनेकजण काहीही कारण नसताना बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना आढळून येत आहे. अशा नागरिकांवर पोलिसांनी जोरदार कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

परेड, सुर्यनमस्कार, शपथ, उठबशा या शिक्षा देण्यासह कायदेशीर कारवाई देखील केली जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 15 पोलिस ठाणे व तीन चौकींअंतर्गत सोमवारी (ता.20) दिवसभरात तब्बल 423 जणांवर कारवाई करण्यात आली. सरकारी आदेशाचे उल्लंघन करीत दुकाने सुरू ठेवणे, विनाकारण रस्त्यावर फिरणे, तोंडाला मास्क न लावणे अशा व्यक्तींचा या कारवाईत समावेश आहे. 

पोलिस ठाणेनिहाय झालेली कारवाई- भोसरी एमआयडीसी (88), भोसरी (22), पिंपरी (10), चिंचवड (17), निगडी (4), आळंदी (8), चाकण (3), दिघी (38), सांगवी (52), वाकड (15), हिंजवडी (44), देहूरोड (8), तळेगाव दाभाडे (19), तळेगाव एमआयडीसी (6), चिखली (37), म्हाळुंगे चौकी (3), रावेत चौकी (37), शिरगाव चौकी (12).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vande Bharat Accident : सिद्धेश्वर, उद्यानसह दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठा फटका! वंदे भारत दुर्घटनेनंतर रेल्वे विस्कळीत, 7 तास उशिरा गाड्या

Insta-Fb New Rules : मृत्यूनंतर तुमचं फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? ‘डिजिटल मृत्युपत्र’ अन् ‘डिजिटल वारसा कायदा’ काय आहे जाणून घ्या

९ वर्षांनी परत येतेय झी मराठीची जुनी नायिका! 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री; प्रेक्षक खुश

Kolhapur Crime News : "इथून पुढे कोणत्याही हिंदू मुलीच्या नादाला लागणार नाही..." शाहिद सनदीने हात जोडून मागितली माफी, व्हिडिओ समोर

IPL 2026: विराट कोहलीला एकच व्यक्ती चॅलेंज देऊ शकतो, तो म्हणजे...; इरफान पठाणची पोस्ट चर्चेत, तुम्हालाही पटेल त्याची गोष्ट

SCROLL FOR NEXT