पुणे

पुण्यात मास्क न लावता फिरताय का? मग ही बातमी नक्की वाचा 

सकाळवृत्तसेवा

कोथरूड : कोरोना टाळण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक असताना अनेक लोक मास्क न वापरता, बेफीकीरपणे रस्त्यावर फीरत असतात. त्यामुळे ते स्वतःसोबत इतरांचेही आरोग्य धोक्यात आणत आहेत. अशा लोकांना शिस्त लावण्यासाठी कोथरूडमधील महापालिकेच्या आरोग्य कर्मचा-यांनी जनजागृती मोहीम सुरू केली. मास्क लावणार की दंड भरणार? असे विचारत सुरू झालेल्या या मोहिमेत अवघ्या एका तासात अकरा हजार रूपये शुल्क वसूल करण्यात आले. 

पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकून अस्वच्छता करणाऱ्या व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

सदर कारवाईचे आदेश विभागीय आयुक्तामार्फत देण्यात आले आहेत. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी व पोलिस यंत्रणेला कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार कोथरूड, बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक १२ डहाणूकर काॅलनी हजेरी कोठी अंतर्गत आरोग्य विभाग व लक्ष्मीनगर पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी यांच्या वतीने डहाणूकर काॅलनी भुयारी मार्ग कै. मोहनराव शिराळकर चौकात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी पान तंबाखू व गुटखा खाऊन थूंकणारे थुंकी बहाद्दरांवर संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात आली.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मास्क न वापरणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून पाचशे रुपये व थुंकी सम्राटाकडून एक हजार रुपये प्रमाणे दंड घेवून कारवाई करण्यात आली. मास्क न वापरणारे अठरा व सार्वजनिक ठिकाणी थुंकून कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या तीन अशा एकूण एकवीस नागरिकांवर कारवाई  करण्यात आली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खिशात पैसे नसणाऱ्या कांही थुंकी सम्राटाना बैठका काढण्याच्या शिक्षाही देण्यात आल्या. सदर कारवाई कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक  राम सोनवणे, आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे,  पोलीस हवालदार गणेश भुजबळ, पोलीस कॉन्स्टेबल गौस मुलाणी, प्रशांत शिंदे, नेताजी गवळी, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे यांनी  केली.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT