bhaji.jpg 
पुणे

पिंपरी : पिंपळे गुरवमध्ये भाजीविक्रेते अन्...

मिलिंद संधान.

नवी सांगवी (पुणे) : दोन दिवसांपुर्वी पिंपळे गुरव मध्ये कोरोणाचे दोन रूग्न सापडल्यामुळे येथील काही भाग महापालिकेकडून सील करण्यात आला आहे. आठ दिवसांपुर्वीही एक कोरोनाबाधीत सापडला होता त्यात परवाच्या दोन रूग्नांची भर पडल्याने पिंपळे गुरवकरांची धाकधुक चांगलीच वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेने येथील निर्बंधही अधिक कडक केले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज पिंपळे गुरव परिसरात महापालिकेने अनाधिकृत भाजीपाला व फळ विक्रेत्यांवर कारवाई केली. 

अतिक्रमण विभागाचे कार्यालयीन अधिक्षक अरूण सोनकुसरे यांनी आपल्या कोरोणा स्टाफसह पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकातून कारवाईला सुरूवात केली. यावेळी पथकातील मजूरांनी पदपथावर पथारी व हातगाड्या घेऊन बसलेल्या भाजी विकेत्यांचा माल जप्त केला. तर काहींच्या हातगाड्याही ट्रक मध्ये टाकल्या. अचानक आलेल्या या अतिक्रमण कारवाईच्या पथकामुळे भाजीविक्रेत्यांची चांगलीच पळापळ झाली. काही ठिकाणी वादविवादही झाले. परंतु अतिक्रमण विभागाने कसलाही कसूर बाकी न ठेवता राजमाता जिजाऊ उद्यान, शिवगणेश चौक, काटेपूरम, कृष्णा चौक, फेमसचौक येथील बारा हातगाड्या, एक टेम्पो ताब्यात घेऊन सर्व पथारीवाले, फेरीवाल्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अतिक्रमण विभागाचे कार्यालयीन अधिक्षक अरूण सोनकुसरे म्हणाले, " नवी सांगवीत पीडब्ल्युडी मैदानावर महापालिकेने अधिकृत भाजीमंडई सुरू केली आहे. कोरोणाला आळा घालायचा असेल तर सुरक्षित ठिकाणाहूनच भाजी खरेदी केली पाहिजे. पीडब्ल्युडी व्यतिरिक्त काही निवडक ठिकाणी महापालिकेचे पास भाजीविक्रेत्यांना दिले आहेत. "

या अतिक्रमण कारवाईत महापालिकेचे कोरोणा स्टाफ, एक बीट निरिक्षक, अतिक्रमण विरोधी पथकातील पोलिस व सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस सहभागी झाले होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

National Sports Day: २९ ऑगस्टलाच राष्ट्रीय क्रीडा दिन का साजरा होतो? महान खेळाडूची एक महान गाथा...

Maharashtra Monsoon Prediction : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव, चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप - राहुल गांधी

Sugar Price: साखर स्वस्त होणार? 2 लाख टन साखर घेऊन 4-5 जहाजे भारताकडे रवाना; सणासुदीपूर्वी मिळणार दिलासा

SCROLL FOR NEXT