पुणे

महापालिकेची परवानगी न घेणाऱ्या मंडळांवर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सवातील मंडप आणि कमानींच्या परवानगीसाठी मुतदवाढ देऊनही शहरातील निम्म्याच सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी घेतली असून, आतापर्यंत १ हजार ९०० मंडळांचे अर्ज मंजूर झाले आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने गुरुवारी दिली. परवानगी न घेता मांडव आणि कमानी उभारणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.

येत्या २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून, त्यासाठी गणेश मंडळांकडून मंडप टाकण्यात येत आहेत. मात्र, त्यासाठीच्या आवश्‍यक परवानग्या देण्यासाठी महापालिकेने ‘एक खिडकी योजना’ सुरू केली असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरवातीला १६ ऑगस्टपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय होता. मात्र, या मुदतीत केवळ १ हजार ४०० मंडळांनीच परवानगी घेतली. त्यानंतर ही मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली. या प्रक्रियेत कोणत्याही अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने नियोजन करून वेळेत परवानग्या देण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिला होता. 

शुल्कावरून वाद
मांडव आणि कमानीसाठी मंडळांनी अर्ज केला असला, तरी काही मंडळांनी शुल्क वेळेत भरले नसल्याच्या तक्रारी आहेत. मुदत संपल्याने आता शुल्काची रक्कम स्वीकारता येणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE

SCROLL FOR NEXT