water-bottle 
पुणे

बाटलीबंद पाणी उत्पादकावर  उरुळी कांचनमध्ये कारवाई 

सकाळवृत्तसेवा

पुणे - विनापरवाना बाटलीबंद पाणी विकणाऱ्या उरुळी कांचन येथील व्यावसायिकाला अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) "स्टॉप ऍक्‍टिव्हिटी'ची नोटीस बजावली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच बाटलीबंद पाण्याची मागणी वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. 

उरुळी कांचन येथील शंभो इंडस्ट्रीजमध्ये अभिजित चांदगुडे यांच्या मालकीच्या प्लॅंटची "एफडीए'ने नुकतीच तपासणी केली. यात 20 लिटरच्या बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करण्यात येत होते. संतोष घोडके हे या उत्पादनाची विक्री करीत असताना ही तपासणी करण्यात आली. त्यात पाण्याचे उत्पादन करताना परवाना घेतला नसल्याचे स्पष्ट झाले. त्या आधारावर परवाने घेईपर्यंत बाटलीबंद पाण्याचे उत्पादन घेऊ नये (स्टॉप ऍक्‍टिव्हिटी), असा आदेश अन्न सुरक्षा अधिकारी गणपत कोकणे यांनी दिला. येथील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, ""बाटलीबंद पाणी उत्पादन करताना याची नोंदणी आवश्‍यक आहे. ही नोंदणी "एफडीए'कडे केलेली नव्हती. तसेच, बाटलीबंद पाण्याची विक्री करताना त्याच्या जारवर "ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड'ची (बीएसआय) मोहोर असणे आवश्‍यक असते. ती यावर नव्हती. त्यामुळे "बीएसआय'ची मान्यता घेतली नसल्याचे तपासातून पुढे आले. तसेच, उत्पादित केलेले पाणी पिण्यासाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र "नॅशनल ऍक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोटेरट्रिज'च्या (एनएबीएस) मान्यताप्राप्त प्रयोगशाळांकडून घेतलेले नव्हते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.'' 

उन्हाळ्यामुळे मागणी वाढली 
शहरात फेब्रुवारीच्या मध्यातच उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे शहरातील मध्यवस्तींच्या पेठांसह उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. बाटलीबंद पाणी घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असतानाच ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Retirement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार? उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव चर्चेत?

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

SCROLL FOR NEXT