Pune Municipal Corporation esakal
पुणे

High Court कडून स्थगिती उठताच मुठा नदीकाठच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई; महापालिकेने पाडली 90 हजार चौरस फुटावरील बांधकामं

राजाराम पुलापासून पुढे कर्वेनगरमध्ये नदीपात्राच्या लगत हरित पट्ट्यात जागा मालकांनी पक्के बांधकाम केले आहे.

​ ब्रिजमोहन पाटील

‘‘न्यायालयाने कारवाईवरील स्थगिती उठविल्यानंतर आज सकाळपासून हरित पट्ट्यातील बांधकामावर कारवाई सुरु केली.''

पुणे : कर्वेनगर येथे मुठा नदीच्या (Mutha River Pune) हरित पट्ट्यातील अनधिकृत बांधकाम, पत्र्याच्या शेडवरील कारवाईची स्थगिती उच्च न्यायालयाने (High Court) उठवताच महापालिकेने (Pune Municipal Corporation) आज (ता. २७) या भागात १५ मिळकतींवर जोरदार कारवाई करत ९० हजार चौरस फुटावरील बांधकाम पाडून टाकले.

राजाराम पुलापासून पुढे कर्वेनगरमध्ये नदीपात्राच्या लगत हरित पट्ट्यात जागा मालकांनी पक्के बांधकाम केले आहे. तर, काही ठिकाणी शेड मारून मंगल कार्यालय, हॉटेल, गॅरेज आदी व्यवसाय सुरु केलेले होते. हरित पट्ट्यात बांधकाम किंवा शेड उभारून व्यवसाय करता येत नाही, त्यामुळे महापालिकेने या जागा मालकांना नोटीस बजावलेली होती.

त्याविरोधात जागा मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारवाईवर स्थगिती आणली होती. ही स्थगिती बुधवारी (ता. २६) उठविण्यात आली, तसेच याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर आज सकाळी महापालिकेच्या बांधकाम विभागाने मोठा फौजफाटा घेऊन कर्वेनगर येथे नदीलगत हरित पट्ट्यातील बांधकामावर कारवाई सुरु केली. यामध्ये ५ जेसीबी, २ गॅस कटर, १० कामगारांच्या मदतीने कारवाई केली.

यावेळी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलिस कर्मचारीही उपस्थित होते. या ठिकाणी आग लागल्यास त्वरित ती विझविण्यासाठी अग्निशामक दलाचा बंबही तैनात करण्यात आला होता. आज १५ मिळकतींवरील ९० हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडले आहे, शुक्रवारी (ता. २८) उर्वरित अनधिकृत बांधकाम पाडले जाणार आहे.

एकीकडे कारवाई, दुसरीकडे साहित्य वाचवायचा प्रयत्न

महापालिकेने सकाळी कारवाई सुरु केल्यानंतर जेसीबीने शेड पाडण्यास सुरवात केली. त्यावेळी शेडमधील गॅरेज, हार्डवेअरच्या दुकानातील साहित्य बाहेर काढण्यासाठी व्यावसायिकांची गडबड सुरु झाली. हे साहित्य टेंपोमध्ये भरून इतर ठिकाणी हलविण्यात आले.

‘‘न्यायालयाने कारवाईवरील स्थगिती उठविल्यानंतर आज सकाळपासून हरित पट्ट्यातील बांधकामावर कारवाई सुरु केली. आज १५ मिळकतींवर कारवाई करून ९० हजार चौरस फुटाचे बांधकाम, शेड पाडले आहे. उर्वरित कारवाई शुक्रवारी केली जाणार आहे.’’

- बिपिन शिंदे, कार्यकारी अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT