Action Needed at Hospitals saying in funding Miners says Dattatraya Bharane
Action Needed at Hospitals saying in funding Miners says Dattatraya Bharane 
पुणे

निधी मायनसमध्ये सांगणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईची गरज - दत्तात्रय भरणे

डॉ. संदेश शहा

इंदापूर - गरीब रूग्णांवर औषधोपचार करताना काही रूग्णालये निधी मायनस मध्ये असल्याचे सांगत औषधोपचार करण्यास टाळटाळ करतात. सदर रूग्णालयांची अचानक तपासणी करून त्यांच्यावर चाप बसविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार तथा धर्मदाय समितीचे प्रदेश सदस्य 
दत्तात्रय भरणे यांनी केले.

शासनाच्या डिजीटल महाराष्ट्र योजनेअंतर्गत पुणे विभाग धर्मदाय आयुक्त कार्यालय, फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज, इंदापूर आरोग्य संदेश 
प्रतिष्ठान, नेहरू युवा केंद्राच्या वतीने येथील डॉ. नितू मांडके सभागृहात 'विश्वस्त व धर्मादाय आयुक्त एक मुक्त संवाद' परिषदेचे उद्घाटन भरणे यांच्या हस्ते झाले. आप्पासाहेब जगदाळे, सुशिल शहा, मिहिर गांधी, मंगेश दोशी, डॉ. लहू कदम, डॉ. संजय शहा, डॉ. समीर मगर, डॉ. सुश्रूत शहा उपस्थित होते. यावेळी शुभांगी धायगुडे, नवनाथ धायगुडे, शशिकांत शहा यांचा सत्कार झाला.

आमदार भरणे पुढे म्हणाले, गरीब रूग्णांसाठी शासनाने राज्यात ५६ रूग्णालयात १० टक्के खाटा राखून ठेवल्या असून रूग्णांवर मोफत 
उपचार होतात. धर्मदाय समितीचा सर्वाधिक लाभ इंदापूर तालुक्यासमिळाला असून कार्यालयाच्या योजना लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी संयोजकांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. 

पुणे विभाग धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख म्हणाले, काही नागरिकांना पुस्तके तर मलाचेहरेवाचण्याची सवय आहे. त्यामुळे  सर्वसामान्यांच्या आरोग्य समस्या निवारण करण्यासाठी ३० कोटी रूपयांचा निधी दिल्याने अनेकांना जीवदान मिळाले. रूग्णालयात सुविधा पुरविण्यासाठी कंपन्याचा शिल्लक कोट्यावधी रूपयांचा सीएसआर फंड गरीब रूग्ण निधीमध्ये वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

धर्मदाय उपायुक्त नवनाथ जगताप म्हणाले, धर्मदाय कार्यालयाकडे दीड लाख संस्था असून कर्मचारी मात्र ५६ आहेत. कार्यालय माध्यमातून 
४ हजार युवकयुवतींचे विवाह संपन्न झाले. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच डायलिसीसच्या रूग्णांना मदत करण्याचे सामाजिक भान सर्वांनी 
ठेवणे गरजेचे आहे. 

यावेळी सहाय्यक धर्मदाय आयुक्त राहूल चव्हाण, कैलास शेलार, रमेश शिंदे, काकासाहेब मांढरे, विजय शिंदे, संतोष भोसले, महेश निंबाळकर, उज्वला कोठारी यांनी मनोगत व्यक्त केले तर अॅड. रोहिणी पवार यांनी संस्था स्थापना, नियमावलीची माहिती दिली. प्रास्ताविक  डॉ. श्रेणिक शहा तर सुत्रसंचलन डॉ. विकास शहा यांनी केले. आभार डॉ. संदेश शहा यांनी मानले.

'तुम्ही एकवेळ काशीला जावू नका, मात्र गरीबांचा प्राण वाचवा' या आमदार भरणे यांच्या वाक्याने टाळ्या घेतल्या. तर नवनाथ जगताप यांनी धर्मदाय कार्यालय हेच काशी असल्याचे म्हणताच उपस्थितांनी दोघांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.


   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

SCROLL FOR NEXT