Hotels in Pune esakal
पुणे

Pune News : अनधिकृत पब, रेस्टॉरंट, रूफ टॉप हॉटेलांवर पुण्यात कारवाई; फ्रंट-साइड मार्जिनमधील अतिक्रमणे हटविली

कारवाईत आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

महापालिकेने कारवाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच तात्पुरते शेड उभारून व्यवसाय सुरू केला जात असल्याचेही समजते.

पुणे : कोथरूड, पौड रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रोड), हडपसर, सोलापूर रस्ता यासह अन्य भागांत महापालिकेच्या बांधकाम विभागाने (Construction Department) शनिवारी कारवाई करून सुमारे ३० हजार चौरस फुटांवरील अतिक्रमण काढले. त्यामुळे इमारतीच्या फ्रंट व साइड मार्जिनमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या हॉटेलमालकांना (Hotel Owner) दणका बसला आहे.

महापालिकेने (Pune Municipality) गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम केलेले पब, हॉटेल, रेस्टॉरंट, रूफ टॉप हॉटेलांवर कारवाई सुरू केली आहे. कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर रूफटॉप हॉटेल, पबवरील कारवाईत आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात आले आहे.

कोथरूड येथील हॉटेल आशिष गार्डन चौक परिसर आणि पौड रस्त्यावरील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या फ्रंट आणि साइड मार्जिनमधील अतिक्रमणांवर कारवाई झाली. यामध्ये खानदेशी तडका, खाना जंक्शन, ऑक्सिजन कॅफे, ब्ल्युस्टिक पूल, आनंद फास्ट फूड, ममता पराठा, चाय अड्डा, समृद्धी डायनिंग हॉल येथे कारवाई केली. हडपसर येथील हांडेवाडी रस्ता, सोलापूर रस्ता, साडे सतरानळी येथील अनधिकृत रुफ टॉप हॉटेल व बार, रेस्टॉरंट अशा ११ ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून सुमारे १९ हजार चौरस फूट बांधकाम पाडले, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

काही भागांत अभय

डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, आपटे रस्ता या भागांत बांधकाम विभागाने फ्रंट मार्जिनधील हॉटेलांवर कारवाई केली; मात्र काही हॉटेलांना अभय दिल्याचे चित्र आहे. पार्किंगच्या जागेत फ्रंट मार्जिनध्ये हॉटेल सुरू केल्याने या हॉटेलच्या गाड्या रस्त्यावर लावल्या जात आहेत, तरीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आपटे रस्त्यावर दिसून येत आहे. महापालिकेने कारवाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच तात्पुरते शेड उभारून व्यवसाय सुरू केला जात असल्याचेही समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेताजींना राष्ट्रपुत्र घोषित करा, याचिकाकर्त्याची मागणी; सुप्रीम कोर्टानं फटकारलं, म्हणाले, इथून जा नाहीतर..

"खरे विजेते विशाल-अनुश्रीच" प्रेक्षक बिग बॉस मराठी 6 च्या निकालावर नाराज; सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

Basaveshwar Memorial: १५ दिवसांत जमीन वर्ग करणार; ४०० कोटींचा निधी, जयकुमार गोरेंची ग्वाही, मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर स्मारकाचा मार्ग मोकळा!

Mahamastakabhishek Adinath Tirthankar : अक्षय्य तृतीयेचा अभूतपूर्व उत्साह! जैन मठात 18 प्रकारच्या द्रव्यांनी भगवान आदिनाथ तीर्थंकर मूर्तीवर महामस्तकाभिषेक

Kudal MIDC Road Development : नीलेश राणेंचा शब्द अन् उदय सामंतांची कृती! कुडाळ एमआयडीसीला 27 कोटी मंजूर, उद्योगांच्या प्रगतीला मिळणार 'सुसाट' वेग

SCROLL FOR NEXT