market yard pune Sakal Media
पुणे

पुणे : मार्केट यार्डात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अडत्यांवर कारवाई!

५२ हजार रुपये दंड वसूल

प्रविण डोके

पुणे : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अडते (traders) तसेच डमी अडत्यांवर सोमवारी (दि.१०) बाजार समितीने (Market Yard) कारवाई केली. या कारवाईदरम्यान ५५ जणांकडून जीएसटीसह ५२,१५३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे (APMC) प्रशासक मधुकांत गरड यांच्या मार्गदर्शनाखाली तरकारी विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर यांनी ही कारवाई केली. (action on traders violating corona rules in Pune market yard)

करोनाचा संसर्ग वाढला आहे. या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखणे आणि गर्दी कमी करण्यासाठी बाजार समितीने मार्केट यार्डात नियमावली तयार केली आहे. डमी व्यापाऱ्यांवर व्यापार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर, बाजारातील निम्म्या पाकळ्या एक दिवस, दुसऱ्या दिवशी निम्म्या सुरु ठेवण्यात येत आहेत. याशिवाय इतर नियम बनविण्यात आले आहेत. या अनुषंगाने सोमवारी तरकारी विभागात गटप्रमुख डी. बी. वारघडे, डी. जी. थोपटे, एन. जे. राऊत यांनी ही कारवाई केली. पाकळी बंद असताना व्यापार करणाऱ्या व्यापारी आणि बंदी घातली असताना व्यापार करणाऱ्या डमी व्यापाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.

सर्वांनी बाजार समितीला सहकार्य करावं

करोना संसर्गामुळे केलेल्या नियमाची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. नियम न पाळणाऱ्यावर बाजार समितीच्यावतीने कारवाई करण्यात येत. सर्वांनी बाजार समितीला सहकार्य करावं, असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी केलं आहे.

फळ विभागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

मार्केट यार्डातील फळ विभागात सोमवारी (ता. १०) करोनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करून पाच हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT