पुणे जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार देशमुख यांना निवेदन देताना वारकरी महामंडळाचे राज्याध्यक्ष कृष्णाजी रांजणे व वारकरी. 
पुणे

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या नावे बिडी उत्पादनावर त्वरीत बंदी घालुन कारवाई करावी

किरण भदे

नसरापूर - वारकरी संप्रदायाची अस्मिता व महाराष्ट्राचे अराध्यस्थान असलेल्या जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या नावाने बीडी उत्पादन करुन त्याची विक्री करणारया निजामाबाद येथील झुंबरलाल गोरधन या उत्पादकावर त्वरीत कारवाई करुन बीडीवर बंदी घालण्यात यावी. अशी मागणी राज्य वारकरी महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.

संत तुकाराम महाराजांच्या नावाने बीडीचे उत्पादन काढुन उत्पादकाने केवळ वारकरीच नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे. संपुर्ण महाराष्ट्र याच्या बद्दल तिव्र प्रतिक्रीया उमटत असुन शासनाने या बाबत तातडीने लक्ष घालुन या उत्पादनावर बंदी घालण्यात येऊन तुकाराम महाराजांचा अपमान करणारया उत्पादकावर कारवाई करण्याचे निवेदन राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी रांजणे यांनी निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत कार्याध्यक्ष रामेश्वर शास्त्री, सचिव रेवाजी वाळुंज, उपाध्यक्ष जालिंदर काळोखे, गणेश भगत, आदी वारकरी उपस्थित होते.

कृष्णाजी रांजणे या बाबत बोलताना सांगितले कि, समजातील अपप्रवृत्ती व व्यसन यांना आळा बसावा म्हणुन संपुर्ण आयुष्य ज्या जगदगुरुंनी जगाला उपदेश केला त्यांच्याच नावाने बीडीचे उत्पादन केले जात आहे. ही अत्यंत निंदनीय बाब असुन वारकरयांचा घोर अपमान होत आहे. निजामाबाद येथे उत्पादन झालेले हे उत्पादन महाराष्ट्रातील मुबंई, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, आंबेजोगाई, या जिल्ह्यात आजही विक्री चालु आहे. प्रशासनाने यावर त्वरीत बंदी अणुन सर्व उत्पादन ताब्यात घेऊन नष्ट करुन उत्पादकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली असुन, कारवाई न झाल्यास महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीने संपुर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा त्यांनी दिला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT