Baramati Traffic Police esakal
पुणे

Baramati Traffic Police : बारामतीत वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणाऱ्या 125 जणांवर कारवाई; तब्बल 'इतक्या' लाखांचा दंड वसूल

काळ्या काचा असलेल्या 125 वाहनांना 1 लाख 24 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला.

मिलिंद संगई, बारामती

बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचा काळ्या काचा करण्याकडे जास्त कल आहे हे आढळून आले आहे. बारामती वाहतूक पोलिसांकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाते.

बारामती : शहरातील वाहतूक पोलिसांनी (Baramati Traffic Police) चारचाकी वाहनांच्या काचांना काळी फिल्म बसविणा-या वाहनचालकांविरुध्द जोरदार मोहिम राबविली. या अंतर्गत तब्बल सव्वा लाखांचा दंड पोलिसांनी वसूल केल्याची माहिती पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव (Chandrashekhar Yadav) यांनी दिली.

काळ्या काचा असलेल्या 125 वाहनांना 1 लाख 24 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला. दोन दिवसात विना क्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट्स (Fancy Number Plates), अतिवेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सीट, पोलिसांचे आदेश न पाळता निघून जाणे अशा 145 वाहनांवर कारवाई करून 93 हजार 400 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वाहतूक शाखा पोलीस अंमलदार अशोक झगडे, सुधाकर जाधव, प्रदीप काळे, प्रकाश चव्हाण, सीमा साबळे, सविता धुमाळ, अजिंक्य कदम, रेश्मा काळे, माया निगडे, सुभाष काळे, योगेश कांबळे, स्वाती काजळे, रुपाली जमदाडे, योगेश कांबळे यांनी केली.

...म्हणून कारवाईचा बडगा

बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचा काळ्या काचा करण्याकडे जास्त कल आहे हे आढळून आले आहे. बारामती वाहतूक पोलिसांकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाते. विशेष म्हणजे आर्थिक दंड करूनही काहीजण काचांवरील फिल्म काढत नाहीत, हे लक्षात घेत पोलिसांनी या फिल्स काढण्याची कारवाई हाती घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT