पुणे

नियमभंग केल्याने पुणे मार्केट यार्डातील किराणा दुकानांवर कारवाई

प्रविण डोके

मार्केट यार्ड (Pune): शहरातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर समितीने मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. परंतु भुसार बाजारातील काही किराणा दुकानदारांकडून या उपाययोजनांना खो घातला होता. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने भुसार विभागातील ६ व्यापाऱ्यांवर प्रत्येकी ५९०० रुपये दंड करत ३५४०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियम घालून दिले आहेत. मात्र किराणा दुकानदारांकडून सर्व प्रकारचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे बालाजी ट्रेडर्स भु. क्र. 580,581, न्यु बालाजी ट्रेडिंग कं. 582, ओसिया ट्रेडिंग कं. 513, 514, बजरंग ट्रेडिंग कं. 515, सिंघल ट्रेडिंग कं. 519 तसेच बालाजी ट्रेडिंग कं. 512/3 या दुकानांवर कारवाई केली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या मार्गदर्शनानुसार भुसार विभाग प्रमुख नितीन रासकर, प्रशांत गोते, अजित चंद यांनी ही दंडात्मक कारवाई केली.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आले. तसेच नागरिकांची अत्यावश्यक गोष्टींची गैरसोय होऊ नये म्हणून किराणा दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही दुकाने सुरू ठेवताना काही नियम ही घालण्यात आले आहेत. मात्र या दुकानदारांकडून या नियमांना केराची टोपली दाखविली जाात आहे. बाजारात किराणा दुकानात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडत आहे. तसेच दुकानातील अनेक कामगारांच्या तोंडाला मास्क दिसत नाही. वेळेची मर्यादा घालून दिली असतानाही ती पाळली जात नाही. तसेच गर्दीमुळे या इथे वाहतूक कोंडी देखील होत आहे. तसेच या दुकानात होत असलेल्या गर्दी आणि वाहतूकोंडीमुळे आजूबाजूच्या घाऊक व्यापाऱ्यांना याचा त्रास होत असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

बाजारात नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतु परत परत नियम मोडताना आढळून आल्यास त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून समितीला सहकार्य करावे.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजीनगरमध्ये तणाव! ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; जोरदार घोषणाबाजी

Dark Circle Remedy: प्रियांका चोप्राची आई मधु चोप्राने दिलेल्या टिप्सने दूर होतील डोळ्याखालील काळे डाग

PM Modi: 'काँग्रेस देशाला पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती दाखवत आहे..', PM मोदी यांचे टीकास्त्र

Latest Marathi News Live Update: संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि मनसे आमनेसामने; दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

Uddhav Thackeray : मोदींना महाराष्ट्र दिल्ली पाहू देणार नाही! ; उद्धव ठाकरे यांचा घणाघात,आता वानप्रस्थाश्रमात जा

SCROLL FOR NEXT